Fortuner बनवणाऱ्या कंपनीची सर्वेसर्वा असलेली 33 वर्षीय मानसी टाटा कोण? जाणून घ्या मराठी कनेक्शन

Who is Manasi Tata: या तरुणीचा जन्म जन्म 7 ऑगस्ट 1990 रोजी झाला असून देशातील आघाडीच्या कंपन्यांपैकी अनेक कंपन्यांचं नेतृत्व ती करते. ही तरुणी नेमकी आहे तरी कोण आणि तिचा रतन टाटांशी काय संबंध आहे जाणून घेऊयात...

| Nov 01, 2023, 16:29 PM IST
1/11

Who is Manasi Tata Kirloskar the director of Kirloskar JV companies

33 वर्षांची ही तरुणी टोयोटा फॉर्चूनर बनवणाऱ्या कंपनीची सर्वेसर्वा आहे. या तरुणीचं प्रसिद्ध उद्योजक रतन टाटांशी खास कनेक्शन आहे. जाणून घेऊयात तिच्याचसंदर्भात...

2/11

Who is Manasi Tata Kirloskar the director of Kirloskar JV companies

मानसी टाटा या जवळपास 130 वर्षांहून अधिक जुन्या किर्लोस्कर ग्रुपच्या किर्लोस्कर जॉइंट व्हेंचर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अध्यक्षा आहेत. 

3/11

Who is Manasi Tata Kirloskar the director of Kirloskar JV companies

मानसी यांचा जन्म 7 ऑगस्ट 1990 रोजी झाला असून त्या 33 वर्षांच्या आहेत. मानसी यांचे वडील विक्रम किर्लोस्कर यांचं 2022 नोव्हंबर रोजी अचानक निधन झालं. त्यानंतर मानसी यांना किर्लोस्कर जॉइंट व्हेंचरच्या  (JV) बोर्डाचं अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं.

4/11

Who is Manasi Tata Kirloskar the director of Kirloskar JV companies

मानसी यांना या पदावर नियुक्त करण्यात आल्याने त्या टोयोटा इंजिन इंडिया लिमिटेड (TIEI), किर्लोस्कर टोयोटा टेक्सइल प्रायव्हेट लिमिटेड (KTTM), टोयोटा मटिरियल हॅण्डलिंग इंडिया प्रयाव्हेट लिमिटेड (TMHIN) आणि डेनो किर्लोस्कर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (DNKI) या कंपन्याचं नेतृत्व करणार आहेत.

5/11

Who is Manasi Tata Kirloskar the director of Kirloskar JV companies

मानसी टाटा पहिल्यापासूनच टोयोटा किर्लोर्सकर मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बोर्डावर होत्या. मात्र वडिलांचं अचानक निधन झाल्याने त्यांना उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलं.

6/11

Who is Manasi Tata Kirloskar the director of Kirloskar JV companies

किर्लोस्कर आणि टोयोटाच्या जॉइण्ट व्हेंचरमुळेच फॉर्च्यूनर आणि इनोव्हा बनवणाऱ्या गाड्या भारतात तयार होऊ लागल्या. आज याचं कंपनीचं नेतृत्व मानसी करत आहेत.

7/11

Who is Manasi Tata Kirloskar the director of Kirloskar JV companies

टोयोटा किर्लोर्सकर मोटर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी भारतामध्ये टोयोटाच्या निर्मितीचं आणि विक्रीचं काम पाहते. या कंपनीचं नेतृत्व मानसी टाटांकडेच आहे.

8/11

Who is Manasi Tata Kirloskar the director of Kirloskar JV companies

33 वर्षीय मानसी यांनी अमेरिकेतील रोड आयलॅण्ड स्कूल ऑफ डिझाइनमधून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्या त्यांच्या वडिलांबरोबर काम करु लागल्या. 2019 साली त्यांचं लग्न नेविल टाटांबरोबर झालं. 

9/11

Who is Manasi Tata Kirloskar the director of Kirloskar JV companies

नेविल टाटांचे वडिलांचं नाव नोएल टाटा असून ते प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटांचे सावत्र भाऊ आहेत. म्हणजेच रतन टाटा हे मानसी यांचे चुलत सासरे आहेत. टाटा कुटुंबाची सून असूनही मानसी यांचं राहणीमान फारच साधं आहे. त्या जाणीवपूर्वकपणे प्रसारमाध्यमांपासून दूर राहतात.

10/11

Who is Manasi Tata Kirloskar the director of Kirloskar JV companies

मानसी यांचे वडील विक्रम यांनीच टोयोटा कंपनी भारतात आणली. त्यांनी 1997 साली टोयोटाबरोबर सहकार्य करार केला. यामध्ये 11 टक्के हिस्सा किर्लोस्कर ग्रुपकडे आला.

11/11

Who is Manasi Tata Kirloskar the director of Kirloskar JV companies

विक्रम यांचे आजोबा म्हणजेच मानसी यांचे पणजोबा शंतनुराव लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी या ग्रुप उद्योग समुहाच्या स्थापनेत महत्त्वाचा वाटा उचलला. किर्लोस्कर समूहाचे मराठमोळे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर शंतनुराव यांचे वडील होते.