तुमच्या मोबाईललाही असते Expiry Date! जाणून घ्या कशी पाहता येते ही तारीख

Mobile Expiry Date: आपल्यापैकी अनेकांनी वेगवेगळ्या गोष्टींना असलेल्या एक्सपायरी डेटबद्दल माहिती असेल. मात्र मोबाईलला एक्सपायरी डेट असते का? खरं तर मोबाईल अनेक वर्ष वापरला जातो. पण त्याला खरंच एक्सपायरी डेट असते का? 

Swapnil Ghangale | Dec 05, 2023, 11:18 AM IST
1/10

mobile phone expiry date how to check

स्मार्टफोनची युनिव्हर्सल एक्सपायरी डेट सिस्टीम नाही. म्हणजेच मोबाईलची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर हे अवलंबून असतं. याचाच दुसरा अर्थ असा की वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी धोरणं याबद्दल असतात.

2/10

mobile phone expiry date how to check

तसेच इतर प्रोडक्टमध्ये ज्या दिवशी आपण प्रोडक्ट घेतो तिथपासून त्याची गँरंटी, वॉरंटी लागू होते. मात्र मोबाईलच्या एक्सपायरी डेटबद्दल हे लागू होत नाही. एक्सपायरी डेटचा हिशोब हा पूर्णपणे निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर अवलंबून असते.

3/10

mobile phone expiry date how to check

तुमच्या स्मार्टफोन डिव्हाइसची निर्मिती कधी झाली यावर एक्सपायरी डेटचा हिशोब अवलंबून असतो. वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या स्मार्टफोनची एक्सपायरी डेट वेगवेगळी असते.

4/10

mobile phone expiry date how to check

Apple चा आयफोन हा 4 ते 8 वर्ष वापरता येतो असं कंपनीचं म्हणणं आहे. पण या डिव्हाइसची स्थिती कशी आहे त्यावर तो अधिक काळ वापरता येईल की नाही हे निश्चित करता येतं.

5/10

mobile phone expiry date how to check

सॅमसंग ही जगातील सर्वाधिक अॅण्ड्रॉइड फोन विकणारी कंपनी आहे. अगदी 8 हजारांपासून ते काही लाखांपर्यंतचे या कंपनीचे फोन आहेत. मात्र सॅमसंग कंपनीच्या मोबाईल फोनची एक्सपायरी डेट ही 3 ते 6 वर्षांची असते. तर गुगलच्या फोनची एक्सपायरी डेट 3 ते 5 वर्ष इतकी आहे.

6/10

mobile phone expiry date how to check

फोनमधील ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजेच ओएस अपग्रेड करुन घेण्याची सुविधा एका मर्यादित काळासाठी उपलब्ध असते. सामान्यपणे कंपन्या 3 वर्षापर्यंत सिक्युरिटी अपडेट देतात. यावरच सामान्यपणे मोबाईलची एक्सपायरी डेट अवलंबून असते.

7/10

mobile phone expiry date how to check

ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट केली नाही तर नवीन फिचर्स युझर्सला वेळेत मिळत नाहीत. सामान्यपणे कंपन्या नवे फिचर्स आणि अपडेट्स लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टीमवर उपलब्ध करुन देतात. त्यामुळेच ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट ठेवणं महत्त्वाचं असतं.

8/10

mobile phone expiry date how to check

कंपनीकडून सिक्युरिटी अपडेट्स देण्यात आले नाही तर मोबाईलवरील डेटा फिशिंगला बळी पडू शकतो. किंवा या फोनवरील माहिती हॅकर्स चोरु शकतात.

9/10

mobile phone expiry date how to check

तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनची एक्सपायरी डेट तपासून पाहायची असेल तर endoflife.date या वेबसाईटची तुम्ही मदत घेऊ शकता. यावर स्मार्टफोन डिव्हाइजच्या लाईफ स्पॅनबरोबरच सिक्युरिटी अपडेटी माहिती मिळते.

10/10

mobile phone expiry date how to check

तुमच्या मोबाईलची ऑपरेटिंग सिस्टीम अपडेट नसेल तर तुम्हाला व्हॉट्सअपही वापरता येत नाही. व्हॉट्सअप कंपनी वेळोवेळी आपल्या नव्या अपडेटमध्ये जुन्या सिस्टीमवर असलेला सपोर्ट काढून ती अद्यावत करत असते.