Sleeping Habits : तुम्ही देखील दररोज 7 तासांपेक्षा कमी झोपता? काळजी घ्या अन्यथा

Sleeping Habits : चांगली झोप ही आपल्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही. मन ताजेतवाने राहण्यासोबत आणि शरीरासाठीही ती अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्ही दररोज 7 तासांपेक्षा की झोप घेत असाल तर तुमच्या शरीरावर घातक परिणाम होतात. 

Nov 25, 2023, 18:29 PM IST
1/7

आजच्या व्यस्त जीवनात लोकांना पुरेशी झोप होत नाही. कामाची वेगवेगळ्या वेळा त्यामुळे दररोज तुम्हाला आवश्यक झोप मिळत नाही.   

2/7

पुरेशी झोप घेतल्याने मनाला शांती मिळतं आणि पचनक्रिया व्यवस्थित राहते. रोगप्रतिकारक शक्तीची क्षमताही वाढते. 

3/7

पण झोपेच्या कमतरतेमुळे अनेक आजारांना सामोरे जावं लागतं. तज्ज्ञांनुसार व्यक्तीला दररोज 7 ते 9 तासांची झोप आवश्यक आहे. 

4/7

हृदयविकाराचा झटका

पुरेशी झोप झाली नाही तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडत नाही. त्यामुळे उच्च रक्तदाब धोका वाढतो. हृदयविकाराचा धोकाही वाढतो. 

5/7

मानसिक स्थितीवर परिणाम

चांगली झोप झाल्यास मेंदूही नवीन ऊर्जा गोळा करतो. पुरेशी झोप न मिळाल्यास मन ताजेतवाने होत नाही. अनेक मानसिक समस्या उद्भवतात आणि काही वेळा स्मरणशक्तीशी संबंधित समस्याही होतात. 

6/7

वजन वाढणे

अपुऱ्या झोपेमुळे शरीरातील घेरलिन आणि लेप्टिन या दोन हार्मोन्सचे संतुलन बिघडते. घेरलिन हार्मोन भूक वाढतो. झोप पुरेशी झोप मिळाली नाहीत तुमचं वजन वाढतं.

7/7

सतत थकवा जाणवणे

जर तुमची 7 तासांपेक्षा कमी झोप झाल्यास तुम्हाला सतत थकवा जाणतो. एकाग्रता कमी होणे आणि कामावर त्याचा नकारात्मक परिणाम होतो.  (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)