प्री-वेडींग शूट Mamorable करायचंय? मग 'या' बारीकसारीक गोष्टी लक्षात ठेवा

सध्या सेलिब्रिटींपासून सगळ्यांचाच प्री-वेडींग हा आवडीचा ट्रेंड होत आहे.

Jul 12, 2024, 13:28 PM IST

कपडे, हॉल, मेकअप आणि रिती रिवाज या सगळ्या हौस मौज लग्नात केल्या जातात. सध्या सोशल मीडियामुळे प्री-वेडींग शूट ही संकल्पना सर्वांच्याच आवडीची होत आहे. 

1/11

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील आनंदाचा क्षण असतो. काही दिवसांपूर्वीच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडींग फोटोंना नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. 

2/11

लग्नाआधी  फोटोशूट करणं आजकाल सगळ्यांनाच आवडू लागलं आहे. पण तुम्हाला माहितेय का प्री-वेडींग हा ट्रेंड कसा सुरु झाला ?    

3/11

साधारण 2000च्या सुमारास पूर्व चीन, तायवान, आणि कोरिया या देशांत प्री-वेडींग फोटोशूट ची संकल्पना आली असं म्हणतात. 

4/11

लग्नाआधी एकमेकांशी छान नातं तयार व्हावं, या निमित्ताने एकमेकांशी मोकळेपणाने बोलता यावं म्हणून प्री-वेडिंग केलं जातं. 

5/11

या प्री-वेडींग शूटमुळे जोडप्यांमधला अवघडलेपणा दूर होऊन ते खूप छान मित्र व्हावेत हा यामागचा उद्देश असतो.   

6/11

सध्या सोशल मीडियामुळे प्री वेडींगला पसंती जास्त मिळत आहे. जर तुम्हाला सुद्धा प्रीवेडींग शूट करायचं असेल तर काही खास टिप्स नक्की फॉल्लो करा.  

7/11

प्रीवेडींग शूट डेस्टीनेश

जर तुम्ही प्रीवेडींग शुट करण्याच्या विचारात असाल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते शुटचं लोकेशन. तुम्ही पहिल्यांदा भेटलात ते ठिकाण किंवा तुम्ही तुमच्या जोडीदाला प्रपोज केलंत त्या लोकेशनशी तुमच्या आठवणी जोडलेल्या असतात. त्यामुळे जास्त कुठे लांब न जाता ही तुम्ही असा ही प्लॅन करु शकता. 

8/11

त्याशिवाय जर तुमच्या जोडीदाराला निसर्गात रहायला आवडत असेल तर, समुद्रकिनारी , टेकडीवर किंवा एखाद्या हिल स्टेशनवर देखील प्रीवेडींग  शुट करु शकता. 

9/11

आऊटफिट

   प्रीवेडींग शुटमध्ये आऊटफिट काय असावा, याबाबत तुम्ही तुमच्या जोदीदाराशी बोलायला हवं. तुमचा जोडीदार पारंपरिक, वेस्टर्न किंवा कॅज्युअल कोणत्या कपड्यांमध्ये मोकळेपणाने वावरु शकतो हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे.

10/11

तुम्ही जर समुद्रकिनारी प्रीवेडींग शुट करणार असाल तर, पांढऱ्या किंवा फिकट आकाशी रंगाचा गाऊन, पांढरा टी-शर्ट असे कपडे वेअर करु शकता.   

11/11

प्री-वेडींग शुटच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या जोडीदाराला जाणून घेण्यासाठी वेळ मिळतो. या छोट्या मोठ्या गोष्टींमुळे खूप चांगल्या आठवणी तयार होतात.