मुलांना रोज खायला द्या 1 एनर्जी बॉल; हाडे होतील मजबूत; बुद्धीही होईल तीक्ष्ण

DryFruits Balls Benifits: सुक्या मेव्यामध्ये हेल्दी फॅट्सचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन केल्याने दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते. 

| Dec 04, 2023, 15:12 PM IST

Energy balls Benifits: रोज एक एनर्जी बॉल मुलांना खायला दिल्यास खूप फायदेशीर ठरेल. हा एनर्जी बॉल बनवायचा कसा? याचे काय फायदे आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

1/10

मुलांना रोज खायला द्या 1 एनर्जी बॉल; हाडे होतील मजबूत; बुद्धीही होईल तीक्ष्ण

DryFruits Energy balls Benifits For Childrens Health Tips

Energy Balls For Childrens: लहान मुले जेवायला खूप कंटाळा करतात. जेवणाच्या वेळ काहीतरी कारणे शोधून टाळायला बघतात. अशावेळी त्यांच्या शरिराला हवे ते पोषक तत्वे मिळत नाहीत. एनर्जी बॉल हा साऱ्यावर उपाय आहे. रोज एक एनर्जी बॉल मुलांना खायला दिल्यास खूप फायदेशीर ठरेल. हा एनर्जी बॉल बनवायचा कसा? याचे काय फायदे आहेत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

2/10

दीर्घकाळ ऊर्जा

DryFruits Energy balls Benifits For Childrens Health Tips

सुक्या मेव्यामध्ये हेल्दी फॅट्सचे प्रमाण जास्त असते. याचे सेवन केल्याने दीर्घकाळ ऊर्जा टिकून राहते. प्रौढांप्रमाणेच सुक्या मेव्याचे सेवन देखील मुलांच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तुम्ही ड्रायफ्रूटचा एनर्जी बॉल मुलांना खायला द्या. 

3/10

बदामाची पावडर

DryFruits Energy balls Benifits For Childrens Health Tips

बदाम, खजूर आणि मनुका याची गरज आहे. सर्व प्रथम तव्यावर बदाम चांगले तळून घ्या. भाजल्यानंतर थोडे थंड करून मिक्सरमध्ये बारीक करून पावडर तयार करा.बॉल्सना योग्य आकार देण्यासाठी बदामाची पावडर वापरायची आहे.

4/10

मिक्सरमध्ये बारीक करा

For Childrens Health Tips

आता एका भांड्यात 10 खजूर आणि काही मनुके घेऊन मिक्सरमध्ये बारीक करा.आता तव्यावर थोडे तूप लावून खजूर आणि मनुका यांचे मिश्रण भाजायला सुरुवात करा. मऊ झाल्यावर गॅस बंद करा आणि मिश्रण थोडे थंड होऊ द्या.

5/10

रोज एक एनर्जी बॉल

DryFruits Energy balls Benifits For Childrens Health Tips

खजूर आणि मनुका या मिश्रणात बदाम पावडर मिसळा. कणकेप्रमाणे मळून त्याचे छोटे गोळे तयार करा. हे ड्रायफ्रूट बॉल्स साठवून ठेवा आणि रोज एक एनर्जी बॉल मुलांना खायला द्या.

6/10

प्रवासात सोबत

DryFruits Energy balls Benifits For Childrens Health Tips

एनर्जी बॉल बऱ्याच काळासाठी साठवून ठेवता येतो. आणि प्रवास करताना ते तुमच्यासोबत देखील घेऊ शकता.

7/10

सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर

DryFruits Energy balls Benifits For Childrens Health Tips

खजूर आणि बदामाच्या या रेसिपीमध्ये आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे, लोह, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर देखील मोठ्या प्रमाणात आढळतात. त्याचे सेवन मुलाच्या सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

8/10

रक्त वाढ

DryFruits Energy balls Benifits For Childrens Health Tips

शरीरातील रक्त वाढवण्यासाठी ही रेसिपी चांगला पर्याय आहे. त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे मुलांमध्ये अॅनिमिया थांबतो.

9/10

मेंदूच्या विकासात मदत

DryFruits Energy balls Benifits For Childrens Health Tips

मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी ही रेसिपी खूप फायदेशीर ठरू शकते. त्यात बदामाचे प्रमाण जास्त असते, जे मेंदूच्या विकासात मदत करू शकते.

10/10

हाडे मजबूत

DryFruits Energy balls Benifits For Childrens Health Tips

कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड बदाम आणि मनुक्यामध्ये आढळतात, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.