तुमच्या मोबाईलची संपुर्ण माहिती दडलीय 'या' 8 कोडमध्ये...!

आपण वापरत असलेल्या फोनबद्दल तूम्हाला या ट्रिक्स माहित असणं गरजेचं आहे. चला तर मग पाहूया काय आहेत या सोप्या ट्रिक्स

Jan 30, 2024, 18:40 PM IST

 

भारतात iOS फोनच्या तुलनेत अँड्रॉइड फोन मोठ्या प्रमाणात वापरतात. याचं मूळ कारण म्हणजे या फोनची किंमत ही सर्वसामान्यांपासून अगदी उच्च वर्गातील लोकांसाठी असते.  

1/8

*#*#4636#*#*

या कोडद्वारे तुम्ही फोनची संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकता. तुम्हाला बॅटरी, मोबाईल डिटेल्स, वाय-फाय बद्दल माहिती, ॲप्सचा वापर यांची माहिती मिळू शकते. 

2/8

*2767*3855#

हा कोड डायल केल्यानं तुमचा फोन रीसेट होईल. फोन मेमरी डिलीट होईल. त्यामुळे हा कोड आवश्यक असेल तेव्हाच  वापरा. नाहितर तुमच्या फोनवरील डेटा डिलीट होऊ शकतो. 

3/8

*#*#2664#*#*

 या कोडच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनची टच स्क्रीन नीट काम करत आहे की नाही ते तपासू शकता.

4/8

*#*#34971539#*#*

 तुमच्या फोन कॅमेराबद्दल माहिती मिळवण्यासाठी हा कोड वापरला जातो. 

5/8

*#21#

तुमच्या फोनमधील मेसेज, कॉल किंवा डाटा हा सुरक्षित आहे की नाही याबद्दल माहिती मिळवण्यासाठी हा कोड वापरु शकता.   

6/8

*#62#

अनेकदा तुमचा फोन no-service किंवा no-answer म्हणतो. अशा   वेळी तुम्ही   हा कोड तुमच्या फोनमध्ये डायल करू शकता. या कोडच्या मदतीने तुमचा फोन दुसऱ्या क्रमांकावर रीडायरेक्ट झाला आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता.

7/8

*43#

या कोडच्या मदतीने तुम्ही तुमच्या फोनमध्ये कॉल वेटिंग सुरू करू शकता, तर तुम्ही #43# डायल करून ती बंद देखील करू शकता.

8/8

*#06#

या कोडच्या मदतीने तुम्ही IMEI नंबर जाणून घेऊ शकता. या कोडमुळे  कोणताही फोनओळखला जातो.पण प्रत्येक फोनसाठी हा कोड वेगळा असतो. पोलीस या क्रमांकावरून फोन ट्रॅक करू शकतात.