Vastu Shashtra : किचनमधील 'या' गोष्टी देतात नकारातमक गोष्टींना आमंत्राण...

वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही गोष्टी खूप नकारात्मक ठरतात. म्हणूनच या गोष्टी स्वयंपाकघरात कधीही ठेवू नयेत.जर तुम्ही यावर वेळीच लक्ष दिलं नाही तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागेल. 

Jan 30, 2024, 17:04 PM IST

प्रत्येकाच्या ह्रदयाचा मार्ग हा पोटातून जातो, स्वादिष्ट जेवण हे प्रत्येकालाच आवडतं.ते करण्यामागे आपण खूप मेहनत घेतो . पण इतकी सगळी मेहनत करुनही अनेक चुका होतात. या चुका स्वयंपाकात होत नसून स्वयंपाकघरात होतात. चला तर जाणून घेऊया स्वयंपाकघरात 'या' चुकीच्या गोष्टींमूळे काय परिणाम होतात.  

1/7

वास्तूशास्त्रानुसार घरातील प्रत्येक गोष्ट ही वास्तू नियमानुसार करणं गरजेचं आहे. किचनमध्ये कोणत्या गोष्टी नसाव्या याबद्दल पाहया.   

2/7

भिजवलेली कणीक

वास्तुशास्त्रानुसार मळलेलं पीठ हे रात्रभर फ्रिजमध्ये ठेवणं टाळा, कारण यामुळे घरात  नकारात्मक ऊर्जा येते आणि महत्वाचं म्हणजे शिळं पीठ खाल्यानं कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो. 

3/7

औषधे

किचनमध्ये शक्यतो औषधं ठेवू नका, नाहितर घरातील सदस्य सतत आजारी पडू शकतात. म्हणून किचनमध्ये औषध ठेवू नका. 

4/7

आरसा

आपलं स्वयंपाकघर सुंदर दिसावं यासाठी सध्या अनेक प्रकारे सजवलं जातं. पण या सजावटीत आरसा वापरु नका. आरश्यामुळे स्वयंपाकघर नकारत्मक ऊर्जा निर्माण होतो. 

5/7

रात्रीची भांडी

 रात्री जेवण झाल्यानंतर खरकाटी भांडी तशीच न ठेवता ती धूवा. कारण यावर अनेक किटाणू साचतात आणि तूम्ही आजारी पडू शकतात.   

6/7

तुटलेली भांडी

 तुटलेलं भांडं घरात असणं म्हणजे अनेक संकटांना आवाहन देण्यासारखं आहे. त्यामुळे किचनमध्ये कधीही तुटलेलं भांडी ठेवू नका.

7/7

स्वयंपाकघरात मंदिर

स्वयंपाकघरात कधीही देवघर असू नये.वास्तुशास्त्रानुसार हे देखील खूप अशुभ आहे. अनेकवेळा स्वयंपाकघरात लसूण-कांदा इत्यादींचे प्रतिशोधात्मक अन्न तयार केले जाते, त्यामुळे घरात देवाची मूर्ती किंवा चित्र ठेवल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते. देवी-देवतांचा कोप होतो. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)