काही झालं तरी संध्याकाळी सहाच्या आत इथून बाहेर पडावंचं लागतं; भर समुद्रात असलेलं मुंबईजवळचं सर्वात फेमस पर्यटनस्थळ

समुद्रात असलेली एलिफंटा लेणी नेमकी कुठे आहे? इथे जायचे कसे जाणून घेऊया.    

| Aug 31, 2024, 20:47 PM IST

Elephanta Caves Gharapuri island : मुंबईतील घारापुरी म्हणजेच एलिफंटा लेणी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. या बेटावरील डोंगरात पाच लेण्या खोदलेल्या आहेत. घारापुरी बेटावर पोहोचण्यासाठी गेट वे ऑफ इंडिया येथून बोटीने जावे लागते. साधारण एक तासाचा हा बोटीचा प्रवास आहे. मात्र, इथं गेल्यावर वेळेचं भान ठेवावचं लागेल. काही झालं तरी संध्याकाळी सहाच्या आत इथून बाहेर पडावंचं लागतं. जाणून घेऊया या पर्टनस्थाविषयी. 

1/7

गड किल्ल्याप्रमाणेच प्राचीन लेण्या देखील महाष्ट्राच्या वैभशाली इतिहासाचे साक्षीदार आहेत. महाष्ट्रात एक अशी लेणी जी समुद्राच्या मध्यभागी एका लहानशा बेटावरील डोंगरात कोरण्यात आली आहे.  मुंबईजवळचे हे सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे.   

2/7

एलिफंटाहून पुन्हा  गेट वे ऑफ इंडिया येथे येण्यासाठी शेवटची बोट ही सायंकाळी 6 वाजताची आहे. ही बोट सुटली तर इथचं अडकून पडावं लागत. यामुळे येथे सुरक्षारक्षक देखील आहेत. संपूर्ण लेणी परिसरात हे पर्यटकांना बाहेर जाण्याच्या सूचना करत असतात.  

3/7

 एलिफंटाला जाण्यासाठी बोटीशिवाय पर्याय नाही. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटासाठी बोट सुटतात. 

4/7

एलिफंटा लेण्यांमधील प्राचीन गुहा या पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे. मध्ययुगीन रॉक-कट कला आणि उत्कृष्ट वास्तुकलेचा हा एक सुंदर नमुना आहे. यामध्ये एकूण 7 गुहा आहेत. 

5/7

साधारण 9 व्या ते 13 व्या शतकात एलिफंटा लेणीची निर्मीती झाली.  1997 साली या लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला.  एलिफंटा लेणींमध्ये दगडी कोरीव शिल्पे कोरलेली आहेत. ही बौद्धकालीन आहे. तसेच या लेण्यांमध्ये प्राचीन शिवमंदिर देखील आहे.   

6/7

 महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईपासून  6 ते 7  मैल अंतरावर समुद्रातील घारापुरी या लहान बेटावरील डोंगरात एलिफंटा लेणीचे कोरण्यात आली आहे. 

7/7

चारही बाजुंनी समुद्राने वेढलेली ही लेणी आहे ती घारपुरी बेटावरील एलिफंटा लेणी. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत एलिफंटा लेणीचे नाव आहे.