सोनाक्षी सिन्हाची कमाई होणारा पती जहीरपेक्षा 4900% ने जास्त

Zaheer Iqbal Sonakshi Sinha Net Worth : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच बॉयफ्रेंड जहीर इक्बालबरोबर लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. येत्या 23 जूनला हा विवाहसोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया कोण आहे सोनाक्षीचा होणारा पती जहीर इक्बाल आणि त्याची कमाई किती आहे. 

Jun 21, 2024, 21:52 PM IST
1/7

बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. रिपोर्टनुसार सोनाक्षी अभिनेता जहीर इक्बालबरोबर लग्नगाठ बांधणार असून येत्या 23 जूनला विवाहसोहळा पार पडणार असल्यांच सांगितलं जातंय. 

2/7

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालने आपलं नातं चाहत्यांपासून लपवून ठेवलं होतं. 2022 मध्ये पहिल्यांदा या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यावेळी एका कार्यक्रमात जहीरने सोनाक्षीला लव यू म्हटलं होतं. त्यानंतर अनेक कार्यक्रमात सोनाक्षी-जहीर स्पॉट झाले.

3/7

जहीर इक्बालची बॉलिवूडचा भाईजान सलमान खानशी चांगली मैत्री आहे. जहीर इक्लालचे वडील  इक्बाल रत्नासी उद्योगपती आहेत आणि सलमान खानने त्यांच्याकडून काही पैसे उधार घेतले होते. सलमान खानने जहीर इक्बाल आणि त्याच्या वडिलांबरोबरचा एक फोटो शेअर करत ही गोष्ट सांगितली होती.

4/7

मीडिया रिपोर्टनुसार सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बालची ओळखही सलमान खाननेच करुन दिली दिली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. सलमान खानने जहीर इक्लाबला बॉलिवूडमध्येही लाँच केलं. 2019मध्ये जहीर इक्बालने नोटबूक या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. 

5/7

अभिनेता जहीर इक्बालचं नाव अभिनेत्री दीक्षा सेठपासून सना सईदपर्यंत जोडलं गेलं होतं. पण यावर जहीर इक्बालने कधी कुलासा केला नाी. सना आणि जहीरची ओळख एका पार्टीत झाली होती.

6/7

मीडिया रिपोर्टनुसार अभिनेता जहीर इक्बालची नेटवर्थ दोन कोटी रुपये आहे. फॅमिली बिझनेसचा यात समावेश नाही. अभिनय, ब्रँड एंडोर्समेंटमधून ही त्याची कमाई आहे.   

7/7

तर सोनाक्षी सिन्हाच्या कमाईबाबत बोलायचं झालं तरी तिची नेटवर्थ 102  कोटी रुपये इतकी आहे. म्हणजे होणार पती जहारीच्या कमाईपेक्षा 4900% जास्त आहे.