1/5

सेलिब्रिटींच्या खासगी आयुष्यात घडणआऱ्या घडामोडी या कायमच प्रेक्षकांच्या वर्तुळात चर्चेचा विषय ठरतात. अशाच सेलिब्रिटींच्या यादीत गेल्या काही दिवसांपासून ९० च्या दशकातील एका सुरेख अभिनेत्रीचं नाव प्रकाशझोतात आलं होतं. ती अभिनेत्री म्हणजे, पूजा बत्रा. विरासत या चित्रपटातील भूमिकेमुळे गाजलेली पूजा या घडीला गाजत आहे ती म्हणजे तिच्या अत्यंत खासगी विवाहसोहळ्यामुळे. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
2/5

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पूजाच्या विवाहसोहळ्याचे फोटो व्हायरल झाले आणि अनेकांच्याच भुवया उंचावल्या. ज्यानंतर आता खुद्द पूजानेच तिच्या लग्नाविषयीची बाब उघड केली आहे. 'बॉम्बे टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिने ४ जुलै रोजी आपण विवाहबंधनात अडकल्याचा खुलासा केला. 'हो आम्ही लग्न केलं. दिल्लीमध्ये नवाब आणि मी लग्नगाठ बांधली. कुटुंब आणि जवळच्या मित्रांची या लग्नसोहळ्याला उपस्थिती होती', असं ती म्हणाली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
3/5

जवळच्या व्यक्ती आम्हाला लग्नाला आम्ही उशीर का करत आहोत, असंच विचारत होते असा खुलासा तिने केला. आपण फक्त प्रवाहासोबत जात होते. पण, त्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा तो व्यक्ती आहे ज्याच्यासोबत मी उर्वरित आयुष्य व्यतीत करु इच्छिते आणि आता त्यासाठी आता आणखी दिरंगाई करण्यात काहीच अर्थ नाही, असं म्हणत आर्य पद्धतीने लग्न केल्याची माहिती तिने दिली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
4/5

पूजाने या क्षणाला नवाबला ती पहिल्यांदा केव्हा भेटली होती, याविषयीसुद्धा खुलासा केला. एका मित्राने फेब्रुवारी महिन्यात त्यांची ओळख करुन दिली होती. माझ्या मते आम्ही त्या क्षणाला एकमेकांशी जोडलो गेलो होतो, असं ती म्हणाली. आपण नवाबचा कायम आदर केल्याचं सांगत हे नातं मैत्रीपलीकडलंही असू शकतं, याविषयीची हमी तिला मिळाली. भावनिक आणि बौद्धिक पातळीवर आपण एकमेकांशी जोडलं गेल्याचं सांगत तो एक कुटुंबवत्सल व्यक्ती असल्याचा आपल्याला आनंद असल्याची भावना पूजाने व्यक्त केली. (छाया सौजन्य- इन्स्टाग्राम)
5/5
