जमिनीखालचं पुणे पाहून व्हाल थक्क! पाहा स्वारगेट Underground मेट्रो स्टेशनचे भन्नाट Photos

Photos Swargate Underground Metro Station In Pune: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज पुण्यातील स्वारगेट मेट्रो स्थानकाचं लोकार्पण होणार आहे. मोदी स्वत: या मेट्रोनं प्रवास करुन सेवेचा शुभारंभ करणार असून त्यापूर्वी पुण्यातील या जामिनीखालील स्टेशनेच फोटो समोर आलेत. पाहूयात काही खास फोटो...

| Sep 26, 2024, 10:26 AM IST
1/11

swargatemetropune

पुण्यातील ज्या जमिनीखालील मेट्रो स्टेशनचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे त्याचे पहिले फोटो समोर आलेत. चला तर पाहूयात पुण्याच्या पोटात आता नेमकं आहे तरी काय....

2/11

swargatemetropune

शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते पार पडणार असल्याने या दौऱ्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी म्हणून संपूर्ण उद्घाटन सोहळ्याच्या तयारीची पहाणी आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.  

3/11

swargatemetropune

मोदी शिवाजीनगर मेट्रो स्टेशनवरून स्वारगेटपर्यंत मेट्रोनं प्रवास करून त्या मार्गाचं उद्घाटन करतील. उद्घाटनानंतर मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं.

4/11

swargatemetropune

मात्र मोदी ज्या स्वारगेट मेट्रो स्थानकातून प्रवास करणार आहेत त्या मेट्रो स्थानकाचे फोटो पहिल्यांदाच समोर आले आहेत.  

5/11

swargatemetropune

स्वारगेट मेट्रो स्थानक ऐसपैस आणि भरपूर मोठं असल्याचं या फोटोंमधून दिसत आहे. हे मेट्रो स्थानक परदेशी स्थानकांच्या तोडीस तोड असल्याचं फोटो पाहून स्पष्ट होत आहे.  

6/11

swargatemetropune

स्वारगेट मेट्रो स्थानकामध्ये सजावटही फार छान पद्धतीने करण्यात आली असून स्थानकातील इमारतीचे फोटोही शेअर करण्यात आला आहे.  

7/11

swargatemetropune

स्वारगेट मेट्रो स्थानकामधील तिकीट विंडोही या फोटोंमध्ये दिसत आहेत.   

8/11

swargatemetropune

स्वारगेट मेट्रो स्टेशनमुळे पुण्याच्या दक्षिणेलाही मेट्रोचं कनेक्शन मिळणार आहे.   

9/11

swargatemetropune

नरेंद्र मोदींच्या आजच्या दौऱ्यानिमित्त मागील काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तयारीवर लक्ष ठेऊन आहेत.  

10/11

swargatemetropune

पावसामुळे मोदींच्या सभेचं ठिकाण बदललं जाण्याची शक्यता असली तरी मुरलीधर मोहोळ हे  परशुराम महाविद्यालायाच्या प्रांगणातील सभेच्या नियोजनावर विशेष लक्ष ठेऊन होते. या सभेच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी यांच्यासमवेत सभास्थळाच्या व्यवस्थेचा आढावा मुरलीधर मोहळ वेळोवेळी घेत होते.  

11/11

swargatemetropune

पुणे मेट्रोला प्रवाशांचा प्रतिसाद वाढताना दिसतोय. गणेशोत्सवाच्या दिवशी अनंत चतुर्दशीला म्हणजेच 17  सप्टेंबर रोजी तब्बल 3 लाख 46 हजार 633 पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केला.