Salman Khan पासून Priyanka Chopra पर्यंत 'या' कलाकारांचे First Love कोण होतं माहितीये?

Bollywood Celebs First Love : बॉलीवूड स्टार सलमान खानपासून प्रियांका चोप्रा याचं पहिलं प्रेम कोण होतं हे तुम्हाला माहिती आहे का? 

Aug 17, 2023, 18:52 PM IST

Bollywood Celebs First Love : बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहे ज्यांचं पहिले प्रेम अधुरं राहिलं. अनेकांना वाटतं सलमान खानच्या इतक्या अभिनेत्रीशी अफेयरच्या चर्चा रंगल्या होत्या त्यामुळे त्याचं पहिलं प्रेम नेमकं कोण आहे, अनेकांना माहिती नाही. 

1/10

त्यामुळे आज आपण सलमान, प्रियांका, रणबीर, आलिया या बॉलिवूडमधील कलाकारांचे पहिलं प्रेम कोण होतं ते जाणून घेणार आहोत. 

2/10

अभिषेक बच्चन

अभिषेक बच्चनचं लग्न ऐश्वर्या रायशी झालं असलं तरी त्याचं पहिलं प्रेम ही अभिनेत्री करिश्मा कपूर होती. अभिनेत्री करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांची पहिली भेट श्वेता नंदाच्या लग्नात झाली होती. त्यांचा साखरपुडादेखील झाला होता. पण 4 महिन्यांनंतरच दोघांचे ब्रेकअप झालं. 

3/10

सलमान खान

दबंग सलमान खानचं पहिलं प्रेम हे शाहीन जाफरीवर होतं. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान वयाच्या 19 व्या वर्षी शाहीनच्या प्रेमात पागल झाला होता. दोघेही लग्न देखील करणार होते, पण त्यांचं नातं तुटलं. 

4/10

रणबीर कपूर

रणबीर कपूरचं आज आलिया भट्टशी लग्न झालं आहे. पण त्याची पहिली गर्लफ्रेंड होती अवंतिका मलिक...बॉलीवूडमध्ये एन्ट्री करण्यापूर्वी हे दोघं प्रेमात होते. नंतर त्यांचं ब्रेक झालं आणि  अवंतिका मलिकने अभिनेता इम्रान खानशी लग्न केलं.

5/10

करीना कपूर खान

शाहिद कपूर आणि करीना कपूर खान हे एकमेकांचे पहिलं प्रेम होते. दोघेही अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. पण त्यांचं नातं तुटलं. करीना आज सैफची बेगम बनली आहे. तर शाहिदने मीरा राजपूतशी लग्न केलंय. 

6/10

दीपिका पदुकोण

मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री दीपिका पदुकोणचा पहिला बॉयफ्रेंड निहार पांड्या होता. हे नातं जास्त काळ टिकलं नाही. 

7/10

प्रियांका चोप्रा

असीम मर्चंट हा अभिनेत्री प्रियांका चोप्राचा पहिला बॉयफ्रेंड होता. अभिनेत्री मॉडेलिंगमध्ये असताना दोघांमध्ये प्रेम झालं होतं. मिस वर्ल्ड दरम्यानच त्यांचं ब्रेकअप झालं. 

8/10

ऐश्वर्या राय बच्चन

ऐश्वर्या राय आज बच्चन कुटुंबाची सून आहे, पण तिच्या मॉडेलिंगच्या दिवसांत सुपरमॉडेल राजीव मूलचंदानीच्या ती प्रेमात होती, असं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. 

9/10

बिपाशा बसू

अनेकांना माहिती नाही की, अभिनेत्री बिपाशा बसूचं पहिलं प्रेम हे मिलिंद सोमण होतं. याबद्दल अनेकांना माहिती नाही. हे नातं फार काळ टिकलं नाही. 

10/10

आलिया भट्ट

बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी त्यांचं नाव अली दादरकर यांच्याशी जोडलं गेलं होतं. हे नातं फार काळ टिकलं नाही.