मर्सिडीजचे इंजिन, Jeep सारखा लुक; THAR ला टक्कर देणार Force Gurkha

Force Gurkha  ही SUV बुकींग सुरु झाले आहे.

May 03, 2024, 17:59 PM IST

Force Gurkha 5-Door and 3 Door Launched In India: Force  कंपनीने आपली एक जुनीच SUV कार नव्या दमात लाँच केली आहे. Force Gurkha 5-Door and आणि Door SUV इंडियन मार्केटमध्ये लाँच झालेय. या नव्या SUV मध्ये पावरफुल इंजिंन देण्यात आले आहे. याचा लुक देखील तितकाच जबरदस्त आहे. 

1/7

महिंद्रा THAR ला टक्कर देण्यासाठी फोर्स ने नवी SUV कार लाँच केली आहे.   

2/7

Force Gurkha 5-Door ची स्टार्टिंग प्राईज 18 लाख इतकी आहे. तर Force Gurkha 3 -Door  वेरिएंटची स्टार्टिंग प्राईज 16.75 लाख इतकी आहे.   

3/7

ऑफ रोडिंगसाठी ही कार बेस्ट ऑप्शन आहे. एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) विथ इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्युशन (EBD), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम असे जबरदस्त फिचर्स या कारमध्ये मिळतात.

4/7

हिरवा, लाल, पांढरा आणि काळा अशा तीन कलर ऑप्शनमध्ये ही कार उपलब्ध आहे.   

5/7

Force Gurkha ही SUV   5-Door आणि 3 Door असा दोन ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आली आहे.   

6/7

 Force Gurkha या SUV चा लुक  Jeep सारखा आहे. तर, यामध्ये मर्सिडीजचे इंजिन देण्यात आले आहे. 

7/7

Force कंपनीने आपली जुनीच SUV नव्या रुपात लाँच केली आहे. Force Gurkha 5-Door and 3 Door चे बुकींग सुरु झाले आहे.