'तारक मेहता...'चा ओरिजनल 'सोढी' गुरचरण किती मानधन घ्यायचा?

छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील ‘रोशन सिंग सोढी’ ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग हा गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता आहे. तो बेपत्ता झाल्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. आता त्यामुळे सगळ्यांमध्ये चर्चेचा विषय हा गुरुचरण सिंग आहे. यात तुम्हाला माहितीये का की या मालिकेसाठी तो किती मानधन घ्यायचा? 

| May 03, 2024, 16:59 PM IST
1/7

गुरुचरण सिंग

गुरुचरण सिंगनं ‘रोशन सिंग सोढी’ ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानं अनेक वर्ष ही भूमिका साकारली. 

2/7

अचानक झाला बेपत्ता

गुरुचरण सिंग काही दिवसांपूर्वी अचानक बेपत्ता झाला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता लागली आहे.   

3/7

वडिलांच्या तब्येतीमुळे सोडली मालिका

2020 मध्ये गुरुचरण सिंगनं वडिलांची तब्येत चांगली नसल्याचे सांगत मालिका सोडली होती. 

4/7

'या' दिवशी झाला बेपत्ता

22 एप्रिलला दिल्लीहून मुंबईला येत असताना तो बेपत्ता झाला. त्यानंतर त्याच्या वडिलांनी दिल्लीच्या पालम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. 

5/7

शेवटी या ठिकाणी दिसला गुरुचरण

गुरुचरण सिंग सगळ्यात शेवटी दिल्लीतच स्पॉट झाला. त्यावेळी त्याच्या खांद्यावर बॅग देखील होती. तर त्याला बेपत्ता होऊन आता 12 दिवस झाले आहेत. 

6/7

व्हायरल सीसीटीव्हीमुळे एकच चर्चा

सध्या सोशल मीडियावर एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होत असून त्यात गुरुचरण एका ई-रिक्षातून दुसऱ्या ई-रिक्षात बसताना दिसत आहे. ते पाहून नेटकऱ्यांना असं वाटतंय की सगळं काही प्लॅन करण्यात आलं होतं. 

7/7

किती घ्यायचा मानधन?

या मालिकेच्या एका एपिसोडसाठी गुरुचरण सिंग हा 65 ते 80 हजार रुपये घ्यायचा.