GANESH UTSAV 2023 : आपल्या लाडक्या घरगुती बाप्पाचं दर्शन आता झी 24 तासवर ; पाहा बाप्पाचे वेगवेगळे रूप आणि सुंदर आरास

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

Sep 22, 2023, 14:56 PM IST

जगभरात लाडक्या गणरायाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे.हिंदु धर्मीयांचे आराध्यदैवत म्हणजे श्री गणेश! भाद्रपद महिन्यात शुध्द चतुर्थीला येणारा गणेशोत्सव आजही हिंदु बांधव मोठया आनंदाने, उत्साहाने आणि चैतन्याने साजरा करताना आपल्याला पहायला मिळतात.

1/7

अनिकेत नार्वेकर

अनिकेत नार्वेकर यांच्याकडे बाप्पाची सजावट खूप सुंदर आणि आकर्षित पद्धतीने करण्यात आली आहे, लाइटिंगच्या मदतीने बाप्पाही खूप विश्लेषणीय दिसत आहे. 

2/7

शुभम वनमाला

शुभम वनमाला यांनी श्री रामजन्मभूमी आणि अयोध्याचे मंदिराचे प्रदर्शन केले आणि त्या थीमनुसार बाप्पाचे डेकोरेशन पूर्ण केले. 

3/7

शंकर जाधव

शंकर जाधव यांनी या वर्षी श्री केदारनाथ ची प्रतिकृती साकरण्याचा प्रयत्न केलाआहे, आणि ही प्रति कृती देखील पर्यावरण पूरक आहे .   

4/7

मितेश पाटील

पाटील परिवाराने बाप्पाची सजावटही चांद्रयान-३ नुसार केली आहे, मात्र या विलक्षणीय विचाराची स्तुती बाप्पा देखील करत असतील.

5/7

गणेश भाऊ ससाणे

गणेश भाऊ ससाणे यांच्या घरी बाप्पाचे आगमन अगदी वेगळ्या पद्धतीने पार पडले, बाप्पा चक्क जेजुरीच्या मंदिराच्या सजावटीने सुंदर दिसत आहेत.   

6/7

चेतन भालेराव

 चेतन भालेराव यांनी आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन खूप सुंदर रित्या केले, सोनेरी दिव्याने केले बाप्पाचे आरास मनमोहक. 

7/7

वैशाली वाडकर

 वैशाली वाडकर  यांच्या घरी बाप्पांचे आगमन अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीने झाले, छान लाल फुलांसोबत बाप्पाची सजावट केली आहे.