Ration Card किती प्रकारचे असतात, कोणत्या रेशनकार्डवर किती धान्य मिळतं? काय आहेत सरकारी नियम
Type of Ration Card : केंद्र सरकराच्या किमान सामायिक कार्यक्रमाअंतर्गत गरीबांना केंद्रस्थानी ठेवत सवलतीच्या दराने अन्नधान्य पुरविण्याची योजना (Grain Supply Scheme) देशात सुरु करण्यात आली. या योजनेंतर्गत गरीब कुटुंबाना जीवनावश्यक अन्नधान्य (essential food grains) पुरवलं जातं. लाभार्थ्यांची ओळख पटवण्यासाठी शिधापत्रिका अर्थात रेशनकार्ड (Ration Card) दिलं जातं. रेशनकार्डचे काही प्रकार ठरवण्यात आले असून रेशनकार्डच्या प्रकारानुसार किती धान्य आणि त्याची रक्कम ठरवून दिली आहे. त्यामुळे लाभार्थ्याच्या कार्डवर जितकं रेशन नमुद करण्यात आलं आहे, तितकंच रेशन त्या कुटुंबाला दिलं जातं.
कोणत्या रेशनकार्डवर किती धान्य?

अनेकवेळा अपुऱ्या माहितीमुळे रेशन कार्ड धारकाला आपल्याला किती धान्य मिळतं याविषयी माहिती नसते. यातून लाभार्थ्याची फसवणूक होण्याची शक्यता असते. या फसवणूकिला आळा घालण्यासाठी कोणत्या रेशन कार्डवरती किती धान्य सरकारने उपलब्ध करुन दिलं आहे याची माहिती घेणं आवश्यक आहे. विविध योजनांतर्गत रेशनचे वाटप केले जाते. यामध्ये मोफत रेशन मिळत नसले तरी गरजूंना बाजारभावापेक्षा कमी दरात धान्य पुरवलं जातं.
अंत्योदय अन्न योजना रेशनकार्ड

या योजनेतील लाभार्थ्यांना दर महिन्याला प्रति कुटुंब 35 किलो रेशन मिळते, ज्यामध्ये 20 किलो गहू आणि 15 किलो तांदूळ दिला जातो. लाभार्थींना गहू 2 रुपये किलो दराने आणि तांदूळ 3 रुपये किलो दराने उपलब्ध आहे. हे कार्ड अत्यंत गरीब श्रेणीतील लोकांना दिलं जातं. या कार्डमध्ये इतर कार्डं धारकांपेक्षा जास्त रेशन उपलब्ध आहे.
बीपीएल रेशनकार्ड

सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत दारिद्र्यरेषेखालील (BPL) शिधापत्रिका जारी केल्या जातात. या शिधापत्रिकेवर प्रत्येक कुटुंबाला महिन्याला 10 ते 20 किलो रेशन दिले जाते. रेशनचे हे प्रमाण राज्यानुसार बदलू शकते. तसेच अन्नधान्याच्या किंमतीही राज्य सरकारांवर अवलंबून असतात. मात्र, तो बाजारभावापेक्षा कितीतरी पटीने कमीच असतो.
एपीएल रेशन कार्ड

प्राथमिकता रेशन कार्ड

राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत प्राथमिक शिधापत्रिका (PHH) जारी केली जातात. राज्य सरकार लक्ष्यीत सार्वजनिक वितरण प्रणाली (TPDS) अंतर्गत प्राधान्यक्रमित कुटुंबाची ओळख पटवतात. या प्राधान्य शिधापत्रिकेवर दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो रेशन उपलब्ध आहे. यामध्ये तांदूळ 3 रुपये किलो आणि गहू 2 रुपये किलो दराने दिला जातो.
अन्नपूर्णा रेशन कार्ड
