Deepika Padukone ते Neena Gupta 'या' अभिनेत्रींनी गाजवलं Golden Globes चं रेड कार्पेट

Golden Globes Red Carpet Look : 80व्या गोल्डन ग्लोब अवॉर्डस 2023 अमेरिकेत 10 जानेवारी रात्री 8 वाजता सुरू झाले. परंतु भारतीय प्रेक्षकांना आज (11 जानेवारी 2023) रोजी पाहता येणार आहे. दिग्दर्शक एसएस राजामौली (SS Rajmouli) यांचा 'RRR'  या चित्रपटाने जगभरात आपली जादू दाखवली आहे. सर्वत्र या चित्रपटाचे कौतुक केलं जात आहे. यावेळी बॉलिवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्री प्रियांका चोप्रा, दीपिका पदूकोण आणि नीना गुप्ता यांच्या रेड कार्पेटवरील लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

Jan 11, 2023, 16:01 PM IST
1/5

Deepika Padukone Neena Gupta Priyanka chopra Manasvi Mamgai actress Fashion Game On at Golden Globes Red carpet

प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) 2017 साली गोल्डन ग्लोब्समध्ये राल्फ लॉरेनचा गोल्डन रंगाचा फ्लोअर-लेन्थ बॉडी-हगिंग ड्रेस परिधान करत हजेरी लावली होती. 

2/5

Deepika Padukone Neena Gupta Priyanka chopra Manasvi Mamgai actress Fashion Game On at Golden Globes Red carpet

दीपिका पदुकोणनं (Deepika Padukone) 2017 मध्ये गोल्डन ग्लोब्स इंस्टाईल आफ्टर-पार्टीमध्ये तिनं देखील कॅनरी पिवळा राल्फ लॉरेनचा ड्रेस परिधान केला होता. 

3/5

Deepika Padukone Neena Gupta Priyanka chopra Manasvi Mamgai actress Fashion Game On at Golden Globes Red carpet

माजी मिस इंडिया मनस्वी ममगाईने (Former Miss India Manasvi Mamgai) 76 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात म्हणजेच 2018 साली रेड कार्पेटवर साडी नेसत भारतीय संस्कृती दाखवली होती. 

4/5

Deepika Padukone Neena Gupta Priyanka chopra Manasvi Mamgai actress Fashion Game On at Golden Globes Red carpet

नीना गुप्ता (Neena Gupta) यांनी 2019 मध्ये गोल्डन ग्लोब्स आफ्टर-पार्टीमध्ये हजेरी लावली होती, यावेळी त्यांनी अतिशय सुंदर अशी साडी नेसली होती. त्यांना भारतीय पोशाखात पाहिल्यानंतर सगळीकडे फक्त नीना यांचीच चर्चा सुरु होती. 

5/5

Golden Globe Award 2023 : Deepika Padukone Neena Gupta Priyanka chopra Manasvi Mamgai actress Fashion Game On at Golden Globes Red carpet

प्रियांकानं 2020 मध्ये गोल्डन ग्लोबमध्ये पुन्हा एकदा हजेरी लावली होती. यावेळी तिनं गुलाबी रंगाचा क्रिस्टिना ओटाव्हियानोचा (Cristina Ottaviano) ड्रेस परिधान केला होता.