OMG! 18 लाख खर्च करून हा व्यक्ती बनला लांडगा; लहापणापासूनच स्वप्न केलं पूर्ण

Japanese Wolf Man: जपानमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला लांडगा बनण्याची लहानपणापासून इच्छा होती. लांडगा एक धोकादायक जंगली प्राणी आहे. अखेर या व्यक्तीने अनेक पैसे खर्च करून स्वतःची इच्छा पूर्ण केली आहे. 

Jan 10, 2023, 22:42 PM IST
1/5

या व्यक्तीच्या म्हणण्याप्रमाणे, लहानपणापासूनच त्याला प्राण्यांची आवड होती. यावेळी अॅनिमल सूट पाहिल्यानंतर त्याला लांडग्यांबद्दलच अधिक प्रेम वाटू लागलं. तेव्हाच मनाशी पक्कं केलं की एक दिवस तो नक्कीच लांडगा बनणार.

2/5

मिळालेल्या माहितीनुसार, यासंदर्भात कंपनीला ऑर्डर दिल्यावर वुल्फ सूट 50 दिवसांत तयार झाला. हा सूट खास पद्धतीने तयार करण्यात आलाय.

3/5

त्या व्यक्तीला लांडग्याप्रमाणे बनण्याचं इतकं वेड लागलं होतं की, त्याने कोणताही विचार न करता 30 लाख येन म्हणजेच जवळपास 18.5 लाख रुपये खर्च केले.

4/5

अखेर या व्यक्तीने लाखो रूपये खर्च करून स्वतःचं स्वप्न पूर्ण केलं आहे.

5/5

जगभरात लोकांना विविध इच्छा असतात. यातील काहींच्या इच्छा विचित्र असतात. मात्र सध्या या व्यक्तीची सगळीकडे जोरदार चर्चा आहे.