Good News : पगारवाढीची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी

Feb 11, 2021, 21:29 PM IST
1/5

नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी

नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी

नोकरदार वर्ग दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पगारवाढीची वाट पाहत असतात. दरवर्षी नोकरदार वर्गाची पगारवाढ होत असते. मात्र गेल्यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे पगारवाढ झाली नव्हती. यामुळे आता नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्वाची बातमी मिळत आहे. 

2/5

गेल्यावर्षीपेक्षा चांगली होणार यंदा पगारवाढ

गेल्यावर्षीपेक्षा चांगली होणार यंदा पगारवाढ

ही आनंदाची बातमी एका कंपनीने दिली आहे. ज्यांनी सांगितलं की, यावर्षी पगारात वाढ होणार आहे. विलिस टावर्स वाटसन नावाच्या कंसलटिंग आणि एडवाइजरी फर्मने सांगितलं आहे की, कंपन्यांनी पगारवाढीबाबत सकारात्मक संकेत दिले आहे. यावर्षी जवळपास 6.4 टक्के पगारवाढ होणार आहे. 

3/5

बाजारात आशावाद पाहायला मिळतोय

बाजारात आशावाद पाहायला मिळतोय

विलिस टावर्स वाटसन फर्मने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय कंपन्यांनी मागील वर्षी 2020 साली 5.9 टक्के पगारवाढ दिली आहे. मात्र यावेळी जास्त पगारवाढ होणार आहे. यावर्षी बाजारात आशावाद कायम दिसत आहे. कोरोना महामारीनंतर आता कुठे जीवन सुरळीत होत आहे. यामुळे कंपन्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ देणार यात शंका नाही. 

4/5

हाय स्किल्ड टॅलेंटला मिळणार प्रथम स्थान

हाय स्किल्ड टॅलेंटला मिळणार प्रथम स्थान

विलिस टावर्स वाटसनच्या म्हणण्यानुसार कंपन्या सर्वाधिक हुशार लोकांवर जास्त पैसे खर्च करणार आहे. आता कोरोनानंतर बाजार सांभाळलं जात आहे. या दरम्यान कंपन्यांसमोर देखील अनेक प्रश्न आहे. अशावेळी कंपनी आपल्या जुन्या कर्मचाऱ्यांना सोबत ठेवू इच्छित आहे. याकरता कंपनी कर्मचाऱ्यांकरता सर्वाधिक रक्कमही मोजायला तयार आहे. 

5/5

कोणत्या सेक्टरला सर्वाधिक फायदा आणि कोणाला कमी?

कोणत्या सेक्टरला सर्वाधिक फायदा आणि कोणाला कमी?

मिळालेल्या रिपोर्टनुसार, हाय टेक्नॉलॉजी, फार्मास्यूटिकल्स, कन्झ्युमर प्रोडक्ट, रिटेल प्रोजेक्टमध्ये सामान्यांपेक्षा वाढ झाली आहे. या ग्रुपमध्ये जवळपास 8 टक्के पगारवाढ मिळणार आहे. फाइनेंशियल सर्विस, मॅन्यूफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जवळपास 7%, बीपीओ सेक्टर मध्ये 6 टक्के वाढ झाली आहे.  तसेच एनर्जी सेक्टरमध्ये सर्वात कमी वाढ झाली आहे. ज्यामध्ये फक्त 4.6% वाढ झाली आहे.