Gudi Padwa 2023 : गुढीपाडव्याला गजकेसरी योग, जाणून घ्या सोनं खरेदीचा अमृत मुहूर्त

Gudi Padwa Shubh Muhurat : गुढीपाडवा म्हणजे हिंदूचं नवं वर्ष...श्रीखंड पुरी आणि हापूर आंबाची गोडी...सोबत महिला वर्गामध्ये एक वेगळाच उत्साह असतो तो म्हणजे सोने खरेदीचा...यंदा गुढीपाडव्याला गजकेसरी योग जुळून आला आहे. त्यामुळे जाणून घ्या शुभ मुहूर्त...

Mar 21, 2023, 10:46 AM IST

Gudi Padwa 2023 : गुढीपाडवा (Gudi Padwa 2023 ) हा हिंदू आणि मराठी लोकांचं नवं वर्ष...मग घरोघरी विजयाची गुढी उभारली जाते. महिला आणि तरुणींनी मराठी पारंपरिक वेशभूषा घालून बाईक रॅलीसाठी जातात. याशिवाय महिलांमध्ये सर्वात उत्साह सोने खरेदीमध्ये दिसून येतो. कारण गुढीपाडवा हा सोने खरेदीसाठी (gudi padwa gold price) साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक (Shubh muhurt)...गुढीपाडवा खूप खास आहे, यंदा सोने खरेदीसाठी अतिशय शुभ योग जुळून आला आहे. (gudi padwa gold purchase) 

1/6

Gudi Padwa 2023 Gajkesari Rajyog 2023 gold purchase Shubh muhurt and gudi padwa gold price in marathi

गुढीपाडव्याला मीन राशीत गुरु चंद्रांच्या युतीमुळे गजकेसरी योग तयार होतं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा सर्वोत्तम योग आहे. 

2/6

Gudi Padwa 2023 Gajkesari Rajyog 2023 gold purchase Shubh muhurt and gudi padwa gold price in marathi

साडेतीन मुहूर्त आणि गजकेसरी योग असा हा शुभ मुहूर्त जुळून आला आहे. त्यामुळे सोनं खरेदीसाठी हा गुढीपाडवा अतिशय शुभ आहे. 

3/6

Gudi Padwa 2023 Gajkesari Rajyog 2023 gold purchase Shubh muhurt and gudi padwa gold price in marathi

पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 21 मार्च 2023 ला रात्री 10.52 वाजता सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 22 मार्च 2023 ला रात्री 8.20 वाजता संपणार आहे. उदयतिथीनुसार, गुढीपाडवा 22 मार्च 2023 ला आहे. 

4/6

Gudi Padwa 2023 Gajkesari Rajyog 2023 gold purchase Shubh muhurt and gudi padwa gold price in marathi

गुढी पूजनाचा मुहूर्त सकाळी 6 वाजून 29 मिनिटं ते सकाळी 7 वाजून 39 मिनिटांपर्यंत आहे. 

5/6

Gudi Padwa 2023 Gajkesari Rajyog 2023 gold purchase Shubh muhurt and gudi padwa gold price in marathi

गुढीपाडव्याला सोने खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. पाडव्याला सोनं खरेदी शुभ मानलं जातं. गुढीपाडव्याला सोनं खरेदी संपूर्ण दिवस तुम्ही करु शकणार आहात.

6/6

Gudi Padwa 2023 Gajkesari Rajyog 2023 gold purchase Shubh muhurt and gudi padwa gold price in marathi

गुढीपाडव्याच्या सणाला सोन्याच्या दरांमध्ये सोमवारी (Gold Rates) मोठी वाढ झाली होती. सोन्यानं 60 हजारच्या पार किंमत गाठली होती. (Gold Price Today in Mumbai)