Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याला सजलं विठू-रखूमाईचं मंदिर; विठुरायाचं रूप डोळ्यात टिपण्यासाठी पाहा 'हे' सुंदर फोटो
Gudi Padwa 2023: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिरांमध्येही भक्तिमय (Gudi Padwa Celebration in Marathi) वातावरण निर्माण झाले आहे. पंढरपूर येथील मंदिरात ही फुलांची सजावट करण्यात आली आहे. ही फुलांची सजावट करण्यासाठी नानाविध (Pandharpur Vithu Rakhumai Mandir) फुलांचा वापर करण्यात आला आहे.
Gudi Padwa 2023 Vithu Rakhumai Mandir: साडेतीन मुहूर्त पैकी एक आणि नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढी पाडवा यानिमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (Shri Vithhal Rakhumai Mandir) फुलांची सुंदर अशी आरास केली आहे. संपूर्ण मंदिर फुलांमध्ये सजले आहे. रांजणगाव मधील भाविक नानासाहेब पाचनकर (Gudi Padwa in Pandharpur) यांनी 450 किलो शेवंती, गुलाबी कण्हेर, अष्टर, झेंडू आणि गुलाब फुले वापरून ही फुलांची आरास आज केली आहे.