PHOTO : कास्टिंग काउच, ब्रेस्ट इम्प्लांट करण्यासाठी बोटॉक्स घेण्याचा सल्ला, घरभाड देण्यासाठी पैसे नव्हते, आज ही अभिनेत्री 660000000 ची मालकीण
Entertainment : चौकटीबाहेरच्या भूमिकांना रुपेरी पडद्यावर न्याय देत त्या भूमिका तितक्याच ताकदीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणाऱ्या अभिनेत्रींची संख्या हिंदी कलाविश्वात दिवसागणिक वाढत आहे. अमुक एका धाटणीचेच चित्रपट साकारण्यापेक्षा अभिनय कौशल्य आणखी खुलवण्याचाच प्रत्येक अभिनेत्रीचा अट्टहास असतो. अशीच आपलं वेगळेपण सिद्ध करणारी अभिनेत्री म्हणून या अभिनेत्रीने आपली ओळख निर्माण केलीय.
1/10

बोल्ड आणि बिनधास्त भूमिका साकारणारी राधिका आपटे आज गणेश चतुर्थीला (7 सप्टेंबर) तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. राधिका आपटे यांचा जन्म 7 सप्टेंबर 1996 रोजी पुण्यात झाला. राधिकाच्या वडिलांचे नाव डॉ. चारुदत्त आपटे असून ते पुण्यातील हॉस्पिटलचे चेअरपर्सन आणि न्यूरोसर्जन आहेत. राधिकाने मोठ्या पडद्यापासून ते ओटीटीपर्यंत जगात धुमाकूळ घातला आहे.
2/10

3/10

4/10

राधिका आपटेने 'वाह लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या करिअरला सुरुवात केली. हा चित्रपट 2005 साली आला होता. यानंतर अभिनेत्रीने मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूडशिवाय राधिकाने मराठी, तेलुगू, तामिळ, इंग्रजी आणि बंगाली सिनेमांमध्येही काम केले आहे. चित्रपटांसोबतच ती अनेक वेब सीरिज, टीव्ही सीरियल आणि शॉर्ट फिल्म्समध्येही दिसली आहे.
5/10

पार्च्ड चित्रपटातील तिच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. या चित्रपटात तिने सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. राधिका आपटेने 'पार्च्ड' चित्रपटात टॉपलेस होऊन खळबळ माजवली होती. एका मुलाखतीत राधिकाने सांगितलं की, अभिनेत्रींना अजूनही 'खास बॉडी शेप आणि साइज' नसल्यामुळे नाकारलं जातं. तिला ब्रेस्ट इम्प्लांट करण्यासाठी बोटॉक्स घेण्याचाही सल्ला देण्यात आला होता. राधिकाने उघड केलं की, काही प्रोजेक्ट्स तिच्या हातातून निघून गेले कारण इतर अभिनेत्रींचं स्तन आणि ओठ तिच्या तुलनेत मोठे होते.
6/10

काम देण्याच्या बहाण्याने राधिकाकडे सेक्सुअल फेवरची मागणीही करण्यात आली. राधिकाने स्वतः सांगितलं होतं की, एकदा साऊथच्या एका अभिनेत्याने मला त्याच्या खोलीत बोलावून फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या फटकारण्यावर आम्ही दोघे खूप भांडलो. एकदा एका निर्मात्याचा तिला फोन आला आणि तुम्ही चित्रपटाच्या अभिनेत्याला भेटा असं सांगितलं. तू त्याच्याबरोबर फिजीकल रिलेशन ठेवशील का? अशीही विचारणा केल्याच अभिनेत्री म्हणाली होती.
7/10

8/10

9/10
