शिलाँगच्या जंगलात भारतीय सैन्याचा युद्ध सराव; पाहा खास Photos

सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेल्या भारतीय सैनिकांच्या फोटोंनी देशवासियांची मने जिंकली आहेत. फोटोमध्ये सैनिक सराव करताना दिसत आहेत. हे फोटो हरिमाऊ शक्ती अभ्यास 2023 मधील आहेत, जो भारतीय आणि मलेशियाच्या सैन्याचा संयुक्त सरावाची आहेत.

Oct 30, 2023, 17:44 PM IST
1/7

हरिमाऊ शक्ती अभ्यास 2023

Harimau Shakti 2023

हरिमाऊ शक्ती अभ्यास 2023 हा 23 ऑक्टोबर रोजी उमरोई कॅंट, शिलाँग येथे सुरू झाला आहे. जो 5 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. दोन्ही देशांमधील सुरक्षा सहकार्य द्विपक्षीय संबंध मजबूत करणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. 

2/7

गेल्यावर्षीही केले होते आयोजन

harimau shakti 2022

गेल्या वर्षी 2022 मध्ये, नोव्हेंबरमध्ये मलेशियाच्या पुलाई, क्लुआंग येथे या सरावाचे आयोजन करण्यात आले होते.

3/7

हरिमाऊ शक्तीचा उद्देश काय आहे?

What is the purpose of Harimau Shakti

4/7

राजपूत रेजिमेंटद्वारे नेतृत्व

Led by the Rajput Regiment

या सरावातील मलेशियाच्या तुकडीमध्ये मलेशियन लष्कराच्या 5 व्या रॉयल बटालियनचे सैनिक आहेत. तर भारतीय तुकडीचे प्रतिनिधित्व राजपूत रेजिमेंटच्या बटालियनद्वारे केले जात आहे.

5/7

120 लष्करी जवान सहभागी

120 military personnel participated

6/7

कसा होतोय सराव?

indian army practice

यादरम्यान, दोन्ही बाजू जंगल, निमशहरी आणि शहरी वातावरणात संयुक्त सराव करत आहेत. या सरावात ड्रोन, यूएव्ही आणि हेलिकॉप्टरचाही वापर केला जाणार आहे.  

7/7

नेटकऱ्यांकडून कौतुक

indian army exercises

एएनआय या वृत्तसंस्थेने 30 ऑक्टोबर रोजी हे फोटो पोस्ट केले होते. 23 ऑक्टोबरपासून विदेशी प्रशिक्षण नोड, उमरोई छावणी येथे हा सराव सुरू असून 5 नोव्हेंबर रोजी याचा समारोप होईल. नेटकऱ्यांनी लष्कराच्या जवानांच्या धैर्याचे कौतुक केले आहे.