कोल्ड ड्रिंक, आइसक्रीम ऐवजी‘या’पेयांचा करा समावेश, मिळतील आरोग्यदायी फायदे

शरीराला थंडावा मिळण्याकरीता बरेच जण कोल्ड्रींक आणि आइसक्रीमचं मोठ्या प्रमाणात सेवन करतात. त्यामुळे शरीरावर याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात. त्यामुळे शरीराला थंडावा देण्याबरोबरच ऊर्जा देणारे पारंपारिक पेयांबद्दल जाणून घेऊया. 

Feb 20, 2024, 16:35 PM IST
1/7

भाताची पेज

कोकण भागात भाताच्या पेजेला आरोग्यवर्धक मानलं जातं. उकड्या तांदळाची पेज प्यायल्यानं थकवा दूर होतो. भाताची पेज शरीरातील पाण्याची कमी भरून काढते. 

2/7

ताक

शरीरातील वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी ताक फायदेशीर ठरतं. ताकाचा गुणधर्म थंड असल्याने शरीराला थंडावा मिळतो. त्याचबरोबर ताकाची कढी प्यायल्याने अपचनाचा त्रास होत नाही.   

3/7

लिंबू सरबत

आम्लपित्ताच्या त्रासावर लिंबू फायदेशीर असतो. रोज एक ग्लास लिंबू सरबतात सब्जा मिसळून प्यायल्याने चक्कर येणं, डोकेदुखीचे त्रास दूर होतात. वरण भातासोबतच लिंबाचं लोणच खाल्ल्याने  उलटीचा त्रास होत नाही. 

4/7

कोकम सरबत

कोकम हे पचनसंस्था सुधारण्यास फायदेशीर आहे.  त्वचेवर पित्त उमटणं, खाज येणं यांसारखे त्रास होत असल्यास कोकम सरबताच्या सेवनाने त्वचेचे विकार दूर होतात. कोकमापासून केलेली सोसकढी प्यायल्याने पचनसंस्था सुधारते.   

5/7

नारळाचं पाणी

शहाळ्याचं पाणी शरीरात थंडावा निर्माण करतं. अनेकांना उन्हाळे लागण्याची समस्या होत असते. शहाळ्याच्या पाण्याने लघवीचे विकार दूर होतात.  शहाळ्याचं पाणी शरीरातील घाण साफ करण्यास मदत करतं. 

6/7

ऊसाचा रस

ऊसाचा रस  हा ऊर्जावर्धक मानला जातो. मसालेदार पदार्थांचं सेवन केल्याने पोटात जळजळ होण्याचं प्रमाण वाढतं.ऊसाच्या रसामुळे यकृताशी संबंधीत आजार दूर होतात. 

7/7

कलिंगडचा रस

कलिंगडमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतं. कलिंगडमध्ये पाण्याची मात्रा मुबलक असते, त्यामुळे कोरड्या त्वचेच्या समस्येवर कलिंगड गुणकारी मानलं जातं.