चहा की कॉफी? जास्त Healthy काय? सर्वात 'वादग्रस्त' प्रश्नाचं उत्तर सापडलं

Coffee vs Tea Which Drink Is Healthier: जगभरातील कोट्यवधी लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. अनेक लोकांच्या दाव्यानुसार कॉफी ही चहापेक्षा अधिक आरोग्यदायी असते. तर बऱ्याच जणांचा दावा याच्या अगदी उलट आहे. म्हणजेच चहा हा कॉफीपेक्षा आरोग्यासाठी अधिक फायद्याचा असतो असं चहाप्रेमींचा दावा असतो. मात्र चहा पिणे हे आरोग्यासाठी अधिक फायद्याचे आहे की कॉफी पिणे? यासंदर्भात अनेकदा वाद होतो पण यासंदर्भातील सत्य आता समोर आलं आहे. जाणून घेऊयात या दोघांपैकी अधिक आरोग्यदायी काय आहे?

| Oct 27, 2023, 13:07 PM IST
1/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

चहा आणि कॉफी जगभरामध्ये सर्वाधिक सेवन केली जाणारी पेयं आहेत. जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये ही दोन्ही पेयं प्यायली जातात.

2/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

भारतामध्येही रोज कोट्यवधी लोक आपल्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने करतात. या दोन्ही पेयांमध्ये कॅफीनबरोबरच अनेक घटकांचा समावेश असतो जे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे असतात. अनेक संशोधनांमध्ये या पेयांच्या सेवनाने होणाऱ्या फायद्यांची माहिती समोर आली आहे.

3/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

चहाप्रेमींना चहा हा फार आरोग्यदायी असतो असं वाटतं. तर कॉफीप्रेमींना कॉफी ही चहापेक्षा सरस असल्याचं वाटतं. यावरुन बऱ्याचदा वादही होतो. अनेकदा मस्करीमध्ये हा जगातील सर्वात वादग्रस्त प्रश्न असल्याचंही म्हटलं जातं. 

4/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

'वॉशिंग्टन पोस्ट'ने दिलेल्या वृत्तानुसार, कॉफीमध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं. एका अभ्यासामध्ये कॉफीच्या एका कपमध्ये 1.1 ते 1.8 ग्रॅम फायबर असते.

5/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

कॉफीमध्ये असणारं फायबर आणि संत्र्याच्या रसामधील फायबर सारखेच असते, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 

6/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

दुसरीकडे चहामध्ये फायबर नसतं. त्यामुळेच फायबरचा पुरठवा करणाऱ्या पेयांबद्दल विचार केला तर कॉफी ही चहापेक्षा सरस आहे.

7/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

कॉफी आणि चहा दोन्ही पेयांमध्ये कॅफेन असतं. एक कप कॉफीमध्ये 100 मिलीग्राम कॅफेन असतं. तर एक कप चहामध्ये जवळपास 50 मिलीग्राम कॅफेन असतं.

8/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

कॅफेनमुळे ऊर्जा मिळते आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष्य केंद्रीत करण्याची क्षमता वाढते. कमी प्रमाणात कॅफेनचं सेवन केलं तर मानसिक अडचणींवर मात करण्यास मदत होते.

9/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

कॅफेनचं जास्त सेवन केलं तर आरोग्यविषय समस्या निर्माण होतात. त्यामुळे या बाबतीत चहा हा कॉफीपेक्षा सरस ठरतो.

10/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

एका अभ्यासानुसार कॉफी आणि चहा दोन्हींमध्ये हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक घटक असतात असं समोर आलं आहे. चहा आणि कॉफीच्या सेवाने हृदयासंदर्भातील समस्या आणि हार्ट स्ट्रोक्स येण्याची शक्यता कमी होते.

11/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

चहा आणि कॉफीमध्ये अॅण्टी ऑक्सीडंट आणि पॉलीफेनोल्स असतात जे आरोग्यासाठी फायद्याचे असतात. हृदयाच्या आरोग्याच्या दृष्टीने चहा आणि कॉफी दोन्ही फायद्याचे मानले जातात.

12/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

कॉफीमधील फायबर, मायक्रोबायोम सारखे घटक आरोग्यासाठी फायद्याचे असतात. यामुळे डायबिटीज आणि कॅन्सरचा धोका कमी होतो.

13/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

चहाचं सेवन केल्याने रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मानसिक आरोग्य विषयक समस्यांवर मात करण्यास मदत होते. हृदयाच्या आरोग्यासाठी चहा कॉफी दोन्ही फायद्याचे आहेत.

14/14

Coffee vs Tea Which Drink Is Healthier

एकंदरित विचार केल्यास कॉफी ही चहापेक्षा अधिक आरोग्यदायी मानली जाते. मात्र चहासंदर्भात अधिक संशोधनाची गरज आहे, हे ही खरेच.