Dry Fruits Benefits : कोणते ड्रायफ्रुट्स भिजवून खावेत आणि कोणते खाऊ नये? तज्ज्ञ काय सांगतात

Soaked Dry Fruits Benefits : सुका मेवामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे. पण बदाम, मनुका, काजू यासारखे ड्रायफ्रुट्स कसे खावेत, भिजवून खावेत की खाऊ नयेत याबद्दल संभ्रम असतो. तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या. 

Aug 09, 2023, 07:35 AM IST

Which Dry Fruits Should Be Eaten Soaked in Water : हेल्दी स्नॅक्स म्हणून सुका मेव्या हा उत्तम असल्याचं तज्ज्ञ सांगतात. सुका मेवा हा ऊर्जेने भरलेला असतो. सुका मेवाचा जास्त फायदा मिळवायचा असेल तर कोणत ड्राय फ्रूट्स भिजवून खावं आणि कोणत खाऊ नयेत याबद्दल तज्ज्ञ काय म्हणतात ते जाणून घेणार आहोत. 

1/8

ड्राय फ्रूट्समध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडसह, लोह, प्रथिने, कॅल्शियम आणि झिंक यासारखे आवश्यक नैसर्गिक घटक आढळतात. त्याशिवाय फोलेट, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई सारखे अनेक सूक्ष्म पोषक घटकांमुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते.

2/8

 तुम्ही रोज नियमित सकाळी लवकर नाश्त्यात काही ड्रायफ्रुट्स खाल्ले तर तुम्ही दिवसभर एनर्जीने भरपूर असतात आणि ताजेतवाने राहतात. 

3/8

तुम्ही ड्राय फ्रूट्स पाण्यात भिजवता तेव्हा त्यातील फायटिक अॅसिडचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. तज्ज्ञांनुसार फायटिक ऍसिड हे पोटासाठी खूप हानिकारक असतं. 

4/8

बदाम

बदाम कायम भिजवून खाते. तुम्ही ते 6 ते 8 तास पाण्यात भिजवून बदाम खाल्ल्यास शरीराला शक्ती मिळते. बदामात व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स आणि आवश्यक तेल आहे. पाण्यात भिजवल्यानंतर, त्यातून फायटिक ऍसिड दूर होतं. भिजवलेले बदाम हे हृदयासाठी खूप आरोग्यदायी असतात. 

5/8

अक्रोड

अक्रोड देखील पाण्यात भिजवून खावेत. अनेक प्रकारची फॅटी ऍसिडस्, प्रथिने आणि अनेक प्रकारची खनिजे अक्रोडमध्ये असतात. वजन कमी करण्यासाठी अक्रोडाचं सेवन करणे खूप फायदेशीर असतं. दुधात किंवा स्वच्छ पाण्यात काही वेळ भिजवून ठेवल्यानंतर ते खाल्ल्यास तुम्हाला फायदा होतो. 

6/8

मनुका

मनुका भिजवून खावेत. मनुका हा स्वभावाने उष्ण असल्यामुळे ते भिजवून खाल्ल्याने त्याचा उष्णतेचा प्रभाव कमी होण्यास मदत होते. भिजवलेले मनुके पोटासाठी खूप फायदेशीर असतात. 

7/8

अंजीर

अंजीर देखील खूप गरम आहे. यात भरपूर फायबर असतं आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही संतुलित असतं. त्यामुळे ते कोलेस्ट्रॉल कमी करतं. अंजीर खूप शक्तिशाली आहे. पण पाण्यात भिजवून खाल्ल्याने त्याचा जास्त फायदा होतो. महिलांशी संबंधित आजार आणि रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अंजीरचं सेवन करायला हवं. 

8/8

खजूर

तुम्ही खजूर ओले खाल्ले किंवा दुधात भिजवून खाल्ले तर त्याचे अनेक पटींनी जास्त फायदे शरीराला मिळतात. हृदयरोग आणि मज्जातंतूंशी संबंधित आजारांमध्ये खजूर रामबाण औषध आहे.