महाराष्ट्रात धावली भारतातील पहिली रेल्वे; 172 वर्ष जुना रेल्वे मार्ग जगभर प्रसिद्ध

भारतातील पहिली ट्रेन कधी आणि कुठे धावली? जाणून घेऊया.

| Jan 17, 2025, 23:23 PM IST

First Train In India :  भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील पहिली रेल्वे महाराष्ट्रात धावली. महाराष्ट्रात असलेला हा   172 वर्ष जुना रेल्वे मार्ग जगभर प्रसिद्ध  आहे. 

1/7

महाराष्ट्रातील ज्या मार्गावर भारतातील पहिली रेल्वे धावले तो मार्ग भारतातील सर्वात मुख्य रेल्वे मार्ग बनला आहे.   

2/7

या ऐतिहासिक रेल्वेला 21 तोफांची सलामी देऊन हिरवी झेंडी दाखवण्यात आली होती.   

3/7

1854 मध्ये मुंबई-ठाणे मार्गाचा विस्तार कल्याणपर्यंत करण्यात आला तेव्हा ठाणे खाडीवर भारतातील पहिला रेल्वे पूल असलेले ठाणे मार्गे बांधण्यात आला. 

4/7

 भारतातील ही पहिली रेल्वे 400 प्रवाशांना घेऊन बोरी बंदरहून दुपारी 3.30 वाजता निघाली. ती संध्याकाळी 4.45 वाजता ठाण्यात पोहोचली.

5/7

भारतातील पहिली रेल्वे ही 1,676 मिमी (5 फूट 6 इंच) रुंद आणि 14 डब्यांची होती.   

6/7

16 एप्रिल 1853 रोजी भारतातील पहिली रेल्वे ही बोरी बंदर ते ठाणे ( Bori Bunder Mumbai and Thane) दरम्यान 34 किमी अंतरावर धावली.

7/7

 ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या साहिब, सिंध आणि सुलतान नावाच्या तीन वाफेच्या इंजिनांच्या सहाय्याने भारतातील पहिली रेल्वे धावली.