Karela Benefit : कडू कारल्याचे शरीराला गोडवा देणारे फायदे

कारल्याची भाजी चवीला जरी कडू असली तरी ती खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यामध्ये अनेक पोषक घटक असतात. 

| Oct 26, 2024, 20:34 PM IST
1/6

मधुमेह

कारल्यामध्ये अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे कारले हे रक्तातील साखरेची पातळी कमी करतात आणि मधुमेह नियंत्रित ठेवतात. 

2/6

ह्रदय

कारले हे ह्रदयासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये पोटॅशियम भरपूर असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रित करून ह्रदय निरोगी ठेण्यास मदत होते. 

3/6

पचन

कारल्यामध्ये मोठ्या प्रमाणात फायबरचे प्रमाण असते. त्यामुळे पचनक्रिया देखील मजबूत राहते. 

4/6

रोगप्रतिकारक शक्ती

कारले हे रोगप्रतिकारक शक्तीसाठी खूप फायदेशीर आहे. कारल्यामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. 

5/6

डोळे

त्याचबरोबर डोळ्यांसाठी देखील कारले फायदेशीर आहे. कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए स्त्रोत आहे. जो डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

6/6

आतड्यांसाठी फायदेशीर

कारल्यामध्ये असलेले पोषक घटक आतड्यांसाठी खूप फायदेशीर आहेत.