प्रेमी युगुलांसाठी भारतातील 'हे' मंदिर म्हणजे वरदान! इथे कोणाचीच भीती नाही

प्रेम करताय पण, मनात असंख्य कारणांनी भीती आहे? या मंदिरात येऊन सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवा आणि मनातील भीतीही घालवा. इथे तुमच्या सुरक्षिततेची हमी साक्षात देवाची... 

Nov 02, 2022, 07:46 AM IST

प्रेम करताय पण, मनात असंख्य कारणांनी भीती आहे? या मंदिरात येऊन सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवा आणि मनातील भीतीही घालवा. इथे तुमच्या सुरक्षिततेची हमी साक्षात देवाची... 

1/5

Shangchul Mahadev Temple : काळ बदलला तसतसं व्यक्तीच्या विचार करण्याची क्षमताही बदलली, विचाराच्या कक्षा रुंदावल्या आणि अनेक गोष्टींना अगदी सहज स्वीकृती मिळाली. प्रेमविवाहसुद्धा त्यातलीच एक गोष्ट. असं असलं तरीही अद्यापही काही ठिकाणी प्रेमाच्या या नात्याला स्वीकारलं जात  नाही आणि मग कित्येकदा चुकीची पावलं उचलली जातात. पण, भीतीपोटी ही पावलं उचलण्याऐवजी एकदा या मंदिराला भेट द्या. (India) भारतातच असणाऱ्या या मंदिरात चक्क प्रेमी युगुलांना सुरक्षितता मिळते. विश्वास बसणार नाही, पण हे खरंय. खुद्द देवादिदेव महादेव या जोडप्यांचं रक्षण करतात. (himachal pradeshs Shangchul Mahadev Temple protects couples)  

2/5

(Himachal Pradesh) हिमाचल प्रदेशच्या कुल्लूतील (Kullu) सँज घाटी (Sanjh Valley) परिसरात असणाऱ्या या मंदिराचं नाव आहे, शंगशुल महादेव मंदिर. या भागात महाभारतकाळातील अनेक संदर्भ असणारी ठिकाणं आहेत. हे मंदिरही त्यातलंच एक. वुडकट पद्धतीमध्ये हे मंदिर उभारण्यात आलं आहे. इथं प्रेमी युगुलांना, पळून लग्न (wedding) केलेल्यांना आणि कुटुंबीयांचा विरोध असणाऱ्या जोडप्यांना आश्रय मिळतो.   

3/5

या मंदिरात येणाऱ्या कोणाचाही (Religion) धर्म, (Cast creed) जात - पंथ इथे पाहिला जात नाही. जो कोणी इथे देवाला शरण येतो त्यांच्या राहण्यापासून खाण्यापिण्यापर्यंतची सर्व व्यवस्था करण्यात येते. इथे येणाऱ्या जोडप्यांसाठी गावकरीसुद्धा तितकीच मदत करतात. यामध्ये पोलीसही व्यत्यय आणताना दिसत नाहीत.   

4/5

शंगशुल महादेव मंदिरात (Shangshul Mahadev temple) येणाऱ्या प्रत्येकाला इथल्या गावकऱ्यांनी आखून दिलेले नियम पाळावे लागतात. या नियमांमध्ये मद्य- धुम्रपान करु नये, चामड्याच्या वस्तू सोबत आणू नये, घोडे आणू नये, मोठ्या आवाजात बोलू नये, वाद घालू नये या साऱ्या अटींचा समावेश आहे. इथं येणाऱ्या जोडप्यांच्या वाटेतील अडथळे दूर होत नाहीत तोवर त्यांना इथून कोणीच जाऊ देत नाही. मंदिराचे पुजारी त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतात.   

5/5

असं म्हणतात की, कौरव पांडवांच्या (Kaurav Pandavas) शोधात होते तेव्हा कुंतीपुत्रांनी इथेच शरण घेतली होती. खुद्द महादेवानं (Mahadev) कौरवांची वाट अडवत माझ्या क्षेत्रात आलेल्या कोणालाही कोणीही क्षती पोहोचवू शकत नाही असं खडसावलं होतं, ज्यानंतर कौरवांनी त्यांची वाट वळवली होती. तेव्हापासून आजपर्यंत समाजानं दुरावलेल्या प्रत्येक प्रेमी जोडप्यासाठी किंवा व्यक्तीसाठी हे मंदिर म्हणजे हक्काचं आणि सुरक्षित ठिकाण.