Burn Calories: दिवसभर तुम्ही खूप गोड खाल्ले असेल तर अशा प्रकारे बर्न करा फॅट, वाढणार नाही वजन
Burn Fat: गोड खायला कोणाला आवडत नाही, असे क्वचित एखादा आढळेल. अनेकांना गोड खल्ल्याशिवाय चैन पडत नाही. मात्र, जास्त गोड खाणे तुमच्या आरोग्यासाठी चांगले नसते. त्यामुळे थोडी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा शुगरला ते निमंत्रण ठरु शकेल. बरेचदा असे घडते की आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोड खात राहतो. काही लोकांना गोड खाण्याची इतकी सवय असते की, सकाळी उठल्यावर, जेवण झाल्यावर, झोपण्यापूर्वी काहीतरी गोड खातात. जास्त गोड खाल्ल्याने अनेक आजार होऊ शकतात. शुगर वाढू शकते. दिवाळी काही दिवसांपूर्वीच गेली, सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोडधोड खाल्लेले किती लोक असतील हे माहीत नाही.




