Home Remedies For Teeth Cavity: तुमचे दात सतत किडतात? मग करा 'हे' घरगुती उपाय

Home Remedies For Teeth Cavity: अनेकांना माहित नसेल पण दात हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. इतकंच काय तर हा आपल्या हाडांचा देखील महत्त्वाचा भाग आहे. चावल्याशिवाय आपण जेवण गिळू शकत नाही. आपले आजी-आजोबा बोलतात ना एक घास हा 32 वेळा चावायचा. याचा अर्थ जर आपण जेवण चावलं नाही तर त्याचा आपल्या पचन प्रक्रियेवर परिणाम होतो. बघा तर दात आपल्यासाठी किती महत्त्वाचे आहेत. 

Mar 23, 2023, 18:51 PM IST

Home Remedies For Teeth Cavity:  दात आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे म्हणून त्याची तितिकीच काळजी घेणं हे गरजेच आहे. जर आपण दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं तर त्यामुळे दातदुखी आणि कॅव्हिटी म्हणजेच दातात पोकळी देखील निर्माण होऊ शकते. बोलतात ना की दुधाचे दात किडले की ते पडणार पण जर त्यानंतर आपले दात किडले आणि पडले तर त्यावर आपण काहीही करू शकत नाही. हे सगळं होण्यासाठी आधीच आपण त्याची काळजी घेतली जाते. 

1/6

Home Remedies For Teeth Cavity

लसूण - लसूण हा किती गुणकारी आहे याविषयी आपल्याला माहितच आहे. आयुर्वेदानुसार आपण नेहमीत लसूणचे सेवन केले पाहिजे. लसूणचे सेवन केल्यानं जंतू नष्ट होतात. जर तुम्हाला दात दुखी होत असेल तर लसूण बारीक करून त्याजागी लावा, लवकरच तुम्हाला आराम मिळेल. 

2/6

Home Remedies For Teeth Cavity

अंड्याचे कवच - अंड्याचं कवच हे आपण नेहमीच कचऱ्यात घालतो. पण त्यानं कॅव्हिटीपासून सुटका मिळवू शकता. अंड्याच्या कवचाची पावडर करा आणि त्यात बेकिंग सोडा घालून त्याची पेस्ट करा. ज्या दाताला कॅव्हिटी झाली आहे तिथे ही पेस्ट लावा. 

3/6

Home Remedies For Teeth Cavity

पेरूच्या झाडाची पान - पेरू जितकं चविष्ट फळ आहे तितकीच त्याच्या झाडाची पानं गुणकारी आहेत. एंटी माइक्रोबियल प्रॉपर्टीज पेरूच्या पानांमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. पाण्यात पेरूच्या झाडांच्या पानांना उकळून घ्या आणि जेव्हा ते पाणी कोमट होईल तेव्हा त्यानं गुळण्या करा. त्यानं त्रास कमी होईल. 

4/6

Home Remedies For Teeth Cavity

कडुनिंबाची काडी- ज्यामुळे कॅविटी होते त्या जंतूनपासून कायमची सुटका पाहिजे असेल तर कडुलिंबाच्या काडीनं ब्रश करा किंवा त्याची पानं किंवा बिया चावत रहा. त्यामुळे दात किडणार नाही आणि रक्तस्त्राव होत असेल तर तोही थांबेल. 

5/6

Home Remedies For Teeth Cavity

लवंग - लवंग ही किडलेल्या दातामुळे होणाऱ्या त्रासापासून तुमची सुटका करू शकतो. लवंगमध्ये एंटी बॅक्टेरियर गुणधर्म आहेत. लवंगची पावडर आणि नारळाचं तेल एकत्र करा आणि त्यानंतर कापसाच्या मदतीनं ती पेस्ट दाताला लावा. 

6/6

Home Remedies For Teeth Cavity

ग्रीन टी - ग्रीन टी प्यायल्यानं तुमच्या तोंडात असलेले बॅक्टेरिया नक्कीच नष्ट होतील. तुमचं माऊथवॉशचा फ्लेवर देखील ग्रीन टीचा घ्या. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)