मेकअप न करता घरच्या घरी अशी घ्या त्वचेची काळजी

आजकाल  पार्टी आणि ऑफिसला जाण्यासाठी कमी जास्त प्रमाणात सगळेच मेकअप करतात. कॉस्मॅटीकमध्ये वापरण्यात येणाऱ्या केमिकलमुळे त्वचेवर त्याचा गंभीर परिणाम होतो. त्यामुळे मेकअपशिवाय घरगुती सोप्या पद्धतीने चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी, हे जाणून घेऊया. 

Feb 16, 2024, 19:35 PM IST
1/7

नारळाचं तेल

नारळाचं तेल हे क्लिंजिंगचं काम करतं. नारळाच्या तेलाने चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचेवर ग्लो येतो. कोरड्या त्वचेसाठी नारळाचं तेल गुणकारी मानलं जातं. रात्री झोपण्यापूर्वी नारळाच्या तेलाने चेहऱ्याला मसाज केल्यास रक्ताभिसरण सुधारतं. 

2/7

मध

चेहऱ्याला मध लावल्याने त्वचा चमकदार होते. जर बाहेरच्या प्रदुषणामुळे तुमची त्वचा काळवंडली असेल तर आठवड्यातून तीन वेळा मधाने मसाज करावा. त्याने त्वचेचा रंग सुधारतो. 

3/7

कापूर

कापूरमध्ये असलेल्या नैसर्गिक घटकामुळे इनफेक्शन दूर होतं. जर तुम्हाला चेहऱ्यावर पुरळ येत असतील तर नारळाच्या तेलात कापूर मिसळून मसाज केल्याने पुरळ आणि डागांची समस्या दूर होते. 

4/7

तूप

तूप हे मॉइश्चराइजचं काम करतं.  रोज रात्री झोपण्यापुर्वी चेहर्याला तूप लावल्याने कोरड्या त्वचेला ओलावा मिळतो.   

5/7

तांदळाचं पीठ

बेसन, मसूर आणि तांदळाचं पीठ हे स्क्रबचं काम करतं. जर ब्लॅकहेडची समस्या असल्यास डाळीच्या पीठांचा मसाज फायदेशीर ठरतो.  

6/7

बदामाचं तेल

बदामाच्या तेलामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, कॅल्शिअम, पोटॅशिअम, झिंक, लोह, मॅगनिझ, फॉस्फोरस आणि ओमेगा3 फॅटी अ‍ॅसिड हे घटक त्वचेचा पोत सुधारण्यास मदत करतात. बदामाचं तेल उष्ण असल्याने थंडीमध्ये मसाज केल्य़ास शरीराला ऊर्जा जाणवते.  

7/7

कोरफड

कोरफडीचा गर फक्त केसांसाठीच नाही तर त्वचेच्या आरोग्यासाठी ही फायदेशीर ठरतो. कोरफडी गर आणि केसर एकत्र करून चेहऱ्याला लावल्याने डागांची समस्या दूर होते.