Honda ने लाँच केलीये नवी बाईक... फीचर्स आहेत भन्नाट... जाणून घ्या

आज आम्ही तुम्हाला Honda ने भारतीय बाजारपेठेत लाँच केलेल्या या Honda CB300F बाईकचे फीचर्स, इंजिन आणि किंमतीबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ...

Aug 09, 2022, 17:45 PM IST

Honda कंपनीने Honda CB300F ही नवीन बाईक लॉंच केली आहे. या नवीन बाईकला विशेषत: Hondas च्या प्रीमियम BigWing डीलरशिप नेटवर्कद्वारे विकली जाणार आहे. आज आम्ही तुम्हाला Honda ने भारतीय बाजारपेठेत लाँच केलेल्या या Honda CB300F बाईकचे फीचर्स, इंजिन आणि किंमतीबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ...

1/5

Honda CB300F ची साईज

या बाईकची लांबी 2,084mm लांबी, रूंदी 765mm आणि 1,075mm उंची आहे.  त्याचबरोबर, या बाईकचा व्हिलबेस 1,390mm इतका आहे.  ग्राउंड क्लियरेंस 177mm असून याची सीटची उंची 789mm इतकी आहे. या बाईकचा कर्ब वेट 153kg आहे आणि फ्यूल टँक कॅपेसिटी 14.1-लीटर इतकी आहे.

2/5

Honda CB300F चे फीचर्स

नवी Honda CB300F मध्ये LED हेडलँप आणि टर्न इंडिकेटर्स आणि LED टेल-लाइट्स मिळते. या बाईकसोबत फुल-डिजिटल इंस्ट्रमेंट पॅनल मिळतं. या व्यतिरिक्त होंडा रोडसिंक वॉइस कमांड फीचर देखील या बाईकमध्ये मिळतं.

3/5

Honda CB300F चं इंजन

नवी Honda CB300F मध्ये 293cc ऑयल-कूल्ड 4-वाल्व SOHC इंजन दिलं आहे. 

4/5

Honda CB300F चे व्हिल्स आणि ब्रेकिंग

या बाईकमध्ये 17 इंचचे व्हिल्स दिले आहेत, ज्यामध्ये 110/70 सेक्शन फ्रंट आणि 150//60 सेक्शन रियर टायर दिले आहेत.

5/5

Honda CB300F ची किंमत

Honda CB300F या बाईकचे दोन व्हेरिएंट- Deluxe आणि Deluxe Pro सादर केले आहेत. यांची किंमत अनुक्रमे 2,26 लाख रुपये आणि 2.29 लाख रुपये (एक्स-शोरूम, नवी दिल्ली) इतकी आहे. ही बाईक मॅट एक्सी ग्रे मॅटेलिक, मॅट मार्वल ब्लू मॅटेलिक आणि स्पोर्ट्स रेड या 3 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.