तुम्ही तुमच्या बँक खात्यात किती नाणी जमा करू शकता? जाणून घ्या RBI चा नियम

नाणी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा घटक आहे, आजच्या डिजिटल बँकिंगच्या युगात सुध्दा नाण्यांचे महत्त्व कायम आहे.

Jun 02, 2023, 22:42 PM IST
1/5

देशाताला चलन देण्याचं काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे आहे. सध्या देशात 1,2,5,10,20 रुपयांची नाणी आहेत. नाणी कायदा 2011 अंतर्गत 1000 रुपयांपर्यंतची नाणी जारी केली जाऊ शकतात

2/5

नाणे कायदा, 2011 अंतर्गत भारत सरकारने कायदेशीर निविदा म्हणून जारी केलेली विविध आकारांची, थीम आणि डिझाईन्सची नाणी आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी चलनासाठी जारी केलेली इतर सर्व मूल्यांची नाणी वैध चलन म्हणून चलनात आहेत

3/5

बँक खात्यात किती नाणी जमा करू शकता याबाबत आरबीआयचे म्हणणे आहे की, ग्राहकांना बँकांमध्ये नाणी जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. बँका त्यांच्या ग्राहकांकडून कोणत्याही मूल्याची नाणी स्वीकारण्यास स्वतंत्र आहेत. याचा अर्थ तुम्ही तुमच्या बँक खात्यात कोणतीही रक्कम नाण्यांच्या स्वरूपात जमा करू शकता

4/5

भारत सरकार रिझव्‍‌र्ह बँकेकडून वार्षिक आधारावर मिळणाऱ्या इंडेंटच्या आधारे नाण्यांचे किती प्रमाण काढायचे हे ठरवते. याशिवाय विविध मूल्यांच्या नाण्यांची टांकणी आणि रचना करण्याची जबाबदारीही भारत सरकारची आहे

5/5

तुम्हाला नाणी बदलायची असतील तर तुम्ही बँकेच्या कोणत्याही शाखेत बदलू शकता. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, जनता त्यांच्या सर्व व्यवहारांमध्ये कोणतीही संकोच न करता त्यांची सर्व नाणी कायदेशीर निविदा म्हणून स्वीकारू शकतात.