सर्वाधिक भटकी कुत्री असणारं भारतातील राज्य कोणतं? महाराष्ट्राचा क्रमांक कितवा?

How Many Stray Dogs Exist In India: भटक्या कुत्र्यांचे हल्ले, भटक्या कुत्र्यांनी घेतलेला चावा यासारख्या बातम्या आपण यापूर्वी अनेकदा वृत्तपत्रांमध्ये, वृत्तवाहिन्यांवर पाहिल्या, वाचल्या असतील. मात्र देशात सर्वाधिक भटकी कुत्री कोणत्या राज्यात आहेत ठाऊक आहे का? किंवा सर्वात कमी भटकी कुत्री असलेलं राज्य कोणतं माहितीये का? चला जाणून घेऊयात यासंदर्भात...

| Jun 17, 2024, 15:15 PM IST
1/12

stray dogs exist in India each state

सर्वाधिक भटकी कुत्री असणारं भारतातील राज्य कोणतं? महाराष्ट्राचा कितवा? असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? पडला असेल तर तुम्ही ही थक्क करणारी आकडेवारी एकदा पाहाच...  

2/12

stray dogs exist in India each state

भारतात सर्वाधिक भटकी कुत्री कोणत्या राज्यामध्ये आहे यासंदर्भातील आकडेवारी भारत सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन विभागाने ही आकडेवारी जारी केली आहे.   

3/12

stray dogs exist in India each state

प्रत्येक 1000 नागरिकांमध्ये राज्यात किती भटकी कुत्री आहेत, अशा प्रमाणात ही मोजणी करण्यात आली आहे. या यादीमध्ये कोणकोणत्या राज्यांचा क्रमांका लागतो पाहूयात...  

4/12

stray dogs exist in India each state

प्रत्येक 1000 व्यक्तींमागे सर्वाधिक भटकी कुत्री असणारं राज्य ओडिशा हे आहे. इथे प्रत्येक 1 हजार माणसांमध्ये 40 भटकी कुत्री आहेत.  

5/12

stray dogs exist in India each state

या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर जम्मू-काश्मीर असून येते प्रत्येक 1 हजार माणसांमागे 23 कुत्रे आहेत.  

6/12

stray dogs exist in India each state

तिसऱ्या क्रमांकावर गोवा हे राज्य असून इथे प्रत्येक हजार व्यक्तींमागे 18 भटकी कुत्री आहेत.  

7/12

stray dogs exist in India each state

यानंतर यादीमध्ये अंदमान निरोबार बेटे, कर्नाटक, हरियाणा, राजस्थान, सिक्कीम या राज्यांचा तसेच केंद्रशासित प्रदेशांचा क्रमांक लागतो.   

8/12

stray dogs exist in India each state

त्या खालोखाल गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांचा क्रमांक आहे.  

9/12

stray dogs exist in India each state

महाराष्ट्रामध्ये प्रत्येक एक हजार व्यक्तींमागे 10 भटकी कुत्री आहेत. महाराष्ट्र सरासरी 15 व्या क्रमांकावर आहे.  

10/12

stray dogs exist in India each state

उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, बिहार, पंजाब आणि तामिळनाडूचा क्रमांक महाराष्ट्राच्या खाली आहे.  

11/12

stray dogs exist in India each state

दर हजार व्यक्तींमागे एकही कुत्रा नसणारं मणिपूर हे या यादीत तळाशी आहे. तळाला असलेल्या राज्यांमध्ये लक्षद्वीप, नागालँड, मिझोरमचा समावेश होतो.  

12/12

stray dogs exist in India each state

कुत्र्याच्या संख्येनुसार राज्यांचा हा India in Pixels by Ashris एक्स अकाऊंटवर पोस्ट केलेला नकाशा पाहा.