तुमच्या दुधात डिटर्जंट मिसळलं आहे की नाही कसं ओळखायचं? दूधात चमचा टाकताच दिसेल 'हा' एक बदल

दुधात भेसळ होते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे दुकानातून विकत घेतलं जाणारं पिशवीबंद दूध किती शुद्ध आहे याचा अंदाज लावणं कठीण आहे.   

Shivraj Yadav | Sep 19, 2024, 19:23 PM IST

दुधात भेसळ होते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे दुकानातून विकत घेतलं जाणारं पिशवीबंद दूध किती शुद्ध आहे याचा अंदाज लावणं कठीण आहे. 

1/7

दुधात भेसळ होते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. म्हणजे दुकानातून विकत घेतलं जाणारं पिशवीबंद दूध किती शुद्ध आहे याचा अंदाज लावणं कठीण आहे.   

2/7

दुध वाढवण्यासाठी त्यात पाणी मिसळलं जातं याची अनेकांना कल्पना आहे. पण त्याशिवाय अनेक प्रकारे दुधात भेसळ केली जाते.   

3/7

अनेकदा दुधात डिटर्जंट म्हणजेच कपडे, भांड धुण्यासाठी स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येणारी पावडरही मिसळली जाते.   

4/7

पण ही भेसळ नेमकी ओळखायची कशी हे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने सांगितलं आहे.   

5/7

सर्वात आधी एका ग्लासमध्ये 5 किंवा 10 मिलीलीटर दूध घ्या. यानंतर चमचाने ते दुध ढवळा.   

6/7

यानंतर जर तुमच्या दुधात बुडबुडे आले नाहीत तर त्या दुधात डिटर्जंटची भेसळ कऱण्यात आलेली नाही.   

7/7

पण जर तुमच्या दुधात डिटर्जंट मिसळलं असेल तर मात्र दुधावर बुडबुडे दिसतील.