OTT Apps वापरा फुकटात! मोफत सबस्क्रिप्शनसाठी 'या' ट्रिक्स फॉलो करा

Free OTT Apps: या ट्रीक्समुळे तुमचे पैसे वाचतील आणि तुम्ही कमी खर्चात ऑनलाइन कंटेंट पाहू शकता.   

तेजश्री गायकवाड | Jan 21, 2025, 13:32 PM IST

Free OTT Apps: या ट्रीक्समुळे तुमचे पैसे वाचतील आणि तुम्ही कमी खर्चात ऑनलाइन कंटेंट पाहू शकता. 

 

1/7

भारतात OTT प्लॅटफॉर्मच्या सबस्क्रिप्शनच्या किमती सातत्याने वाढत आहेत. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मसाठी वेगवेगळे सबस्क्रिप्शन घेणे महाग होते. पण जर आम्ही तुम्हाला सांगितले की तुम्हाला हे सबस्क्रिप्शन कमी किंमतीत मिळू शकते तर?.   

2/7

होय, तुम्ही Zee5, Sony Liv आणि इतर स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म मोफत किंवा सवलतीत मिळवू शकता. यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि तुम्ही कमी खर्चात ऑनलाइन कंटेंट पाहू शकता. फ्लिपकार्टच्या सुपरकॉइन्सचा वापर करून तुम्ही OTT सबस्क्रिप्शन कसे मिळवू शकता ते जाणून घ्या.   

3/7

Flipkart Supercoins च्या मदतीने तुम्ही हे करू शकता. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम, तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर फ्लिपकार्टचे ॲप किंवा वेबसाइट उघडायांचे आहे. यानंतर होमपेजवर सुपरकॉइन या पर्यायावर टॅप करा. येथे तुम्हाला तुमची एकूण कॉईन्स दिसतील.  

4/7

सर्च बॅनरवर क्लिक करा, जिथे तुम्हाला Sony Liv, Zee5, Gaana यासह अनेक OTT प्लॅटफॉर्म सापडतील. काही सदस्यत्वांसाठी फक्त SuperCoins आवश्यक असतात, तर काही सदस्यत्वांसाठी तुम्हाला कॉईन्ससोबत काही पैसे द्यावे लागतील.  

5/7

आता तुमच्या आवडीचे OTT सबस्क्रिप्शन निवडा आणि नंतर Use Coin पर्यायावर क्लिक करा. यानंतर तुमच्या फ्लिपकार्ट खात्याच्या 'माय रिवॉर्ड्स' विभागात एक कूपन कोड जनरेट होईल आणि सेव्ह होईल.  

6/7

पुढे तुम्ही निवडलेल्या OTT प्लॅटफॉर्मच्या वेबसाइटवर जा. तुमच्या मोबाईल नंबरसह साइन इन करा आणि मेगा मेनूवर जा आणि 'Activate Offer' पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला मगाशी जनरेट केलेला कूपन कोड टाकावा लागेल.  

7/7

काही प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सदस्यत्वासाठी थोडे पैसे द्यावे लागतील. अशावेळी कूपनचा वापर करा  आणि नंतर उर्वरित रक्कम भरा. यानंतर तुमचे सबस्क्रिप्शन सक्रिय होईल.