अस्सल कांजीवरम साडी कशी ओळखावी? 'या' टिप्स लक्षात ठेवा

लग्नसमांरभात किंवा एखाद्या कार्यक्रमात जाण्यासाठी सुंदर पण सोबर दिसेल असी साडी म्हणजे कांजीवरम. कांजीवरम साडी ही एव्हरग्रीन आहे आणि या साडीची लोकप्रियता कधीच कमी होणार नाही. पण खरी कांजीवरम साडी कशी ओळखावी?

Mansi kshirsagar | Dec 11, 2023, 18:08 PM IST

How To Identify A Pure Kanjivaram Silk Saree: लग्नसमांरभात किंवा एखाद्या कार्यक्रमात जाण्यासाठी सुंदर पण सोबर दिसेल असी साडी म्हणजे कांजीवरम. कांजीवरम साडी ही एव्हरग्रीन आहे आणि या साडीची लोकप्रियता कधीच कमी होणार नाही. पण खरी कांजीवरम साडी कशी ओळखावी?

1/7

अस्सल कांजीवरम साडी कशी ओळखावी? 'या' टिप्स लक्षात ठेवा

How To Identify A Pure Kanjivaram Silk Saree know the tips in marathi

लग्नात किंवा कार्यक्रमात रॉयल लुक हवा असेल तर तुम्ही कांजीवरम साडी नक्की वापरुन पाहिली पाहिजे. पण हल्ली ऑनलाइन शॉपिंग करत असताना कांजीवरमच्या नावाखाली कोणतीही साडी देतात. किंवा कधी कधी दुकानदारही फसवेगिरी करतात. पण खरी कांजीवरम साडी ओळखण्याच्या काही टिप्स आहेत. ते जाणून घेऊया. 

2/7

100 टक्के शुद्ध रेशम

How To Identify A Pure Kanjivaram Silk Saree know the tips in marathi

कांजीवरम साड्या 100 टक्के शुद्ध रेशमापासून बनवल्या जातात. त्यावर विविध प्रकारच्या डिझाइन केल्या जातात. काही साड्यांमध्ये सोन्याची जरीदेखील विणली जाते. आजची या साड्यांची रचना त्याचे वेगळेपण टिकवून आहे. 

3/7

वजन

How To Identify A Pure Kanjivaram Silk Saree know the tips in marathi

अस्सल कांजीवरम साडी वजनाने खूपच हलकी असते कारण त्यात सिल्कचा वापर केला जातो. बनावट साड्यांमध्ये मिश्र सिल्कचा वापर केला जातो त्यामुळं त्या वजनाने जड असतात. कांजीवरम साडी घेताना जर ती जड दिसली तर ती खोटी आहे असं मानू शकतो. 

4/7

धागा

How To Identify A Pure Kanjivaram Silk Saree know the tips in marathi

कांजीवरम साड्यांमध्ये रेशमी धागे वापरले जातात. हे धागे अतिशय बारीक आणि चमकदार असतात. हे धागे मजबूत असतात आणि सहजासहसी तुटत नाहीत. अस्सल कांजीवरम साडी ओळखण्याचा हा उत्तम मार्ग आहे. 

5/7

डिझाइन

How To Identify A Pure Kanjivaram Silk Saree know the tips in marathi

कांजीवर साड्यांमधील डिझाइन हे पारंपारिक असते. या साड्यांवरील डिझाइन हाताने विणलेले असते तसंच, भरतकाम केलेले असते. तर, बनावट साड्यांमध्ये सोप्या व मशीनवर बनवलेल्या डिझाइन असतात. 

6/7

आतील बाजूस धागे

How To Identify A Pure Kanjivaram Silk Saree know the tips in marathi

कांजीवरम साडी ओळखण्याची सोपी पद्धत म्हणजे पदरावरील व काठाचा साडीचा भाग उलट्या बाजूने तपासा जर पदराच्या उलट्या बाजूला धागे दिसत असतील तर कांजीवरम साडी खरी आहे. 

7/7

किंमत

How To Identify A Pure Kanjivaram Silk Saree know the tips in marathi

कांजीवरम साड्यांची किंमती खूप जास्त असतात. तर तुम्हाला स्वस्तात ही साडी मिळत असेल तर समजून जा यातील सिल्क मिश्र आहे.