पावसाळ्यात वीज कोसळताना स्वतःला कसं वाचवाल?

Monsoon Safety Tips: मान्सून अखेर राज्यात बरसला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना आता थोडा दिलासा मिळाला आहे. राज्यातील विविध भागात पावसाला चांगली सुरुवात झाली आहे. त्यामुळं बळीराजा सुखावला आहे. पाऊस सुरू झाल्याने राज्यातील विविध जिल्ह्यात पेरणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, पाऊस सुरू होताच काही दुर्घटनादेखील घडल्या आहेत. पाऊस सुरू झाल्यानंतर वीज कोसळण्याच्या व वीज पडण्याच्या दुर्घटना घडत आहेत. अशावेळी या प्रकरणात कोणाचा जीवही जावू शकतो. वीज कोसळणे म्हणजे काय आणि यापासून बचाव कसा करायचा? जाणून घ्या. 

Jun 20, 2024, 17:41 PM IST
1/8

How to survive a lightning strike: वीज कोसळताना स्वतःला कसं वाचवाल?

आकाशात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट म्हणजे पावसाची सुरुवात पण दरवर्षी वीज कोसळून अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. पण तुम्हाला माहितीये का वीज कशी तयार होते आणि त्यापासून कसा बचाव कराल. आकाशात चमकणारी वीज मोजता येत नाही. पण ही वीज लाखो मेगावॅटची असते. 

2/8

 आकाशात थंड आणि उष्ण हवा एकत्र येतात. या हवेत काही धुळीचे कणही असतात. हवा जशी जास्त वर जाते तशी ती वरच्या थंड वातावरणामुळे गार होत जाते. तिचे नंतर छोटय़ा छोटय़ा बर्फाच्या कणांमध्ये रुपांतर होते. हे लहान लहान बर्फाचे कण एकमेकांवर आपटतात व वरतीच तरंगत रहातात. हे कण एकमेकांवर घासले गेल्यामुळे त्यांच्यामध्ये इलेक्ट्रिक चार्ज डीफरन्स (Electric Charge differance) तयार होतो. तेव्हा आपल्याला वीज कडाडताना दिसते. वीजेचा लखलखाट आपल्याला प्रथम दिसतो आणि नंतर आवाज ऐकू येतो. कारण प्रकाशाचा वेग आवाजाच्या वेगापेक्षा जास्त असतो.

3/8

जोरदार पाऊस आला किंवा ढगांचा कडकाडाट सुरू असेल तेव्हा हमखास वीज कडाडणार हे लक्षात ठेवा. जर तुम्हाला वीज कडाडणार असं वाटत असेल तर स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी ताबडतोब एखाद्या इमारतीत शिरा. पण झाडांच्या किंवा गुरांचा गोठा येथे आसरा घेऊ नका.

4/8

तुम्ही घरात असाल तर वीजेच्या उपकरणांपासून लांब राहा. नळाचे कुठलेही काम करू नका. तसेच दारे व खिडक्यांपासून दूर रहा. 

5/8

 वीज चमकत असताना लोखंड किंवा पितळ जवळ असेल तर त्यापासून दूर व्हा. कारण वीज लोखंडाकडे अॅट्रेक्ट होते. त्यामुळं लोखंडी खिडक्यांजवळही उभे राहू नका. 

6/8

वीज चमकत असताना तुम्ही पोहत असाल तर ताबडतोब पाण्याच्या बाहेर या. इलेक्ट्रीक (विद्युत) उपकरणांपासून दूर रहा.

7/8

What are some tips to survive  a lightning strike to the body?

आकाशात वीज चमकत असताना व विजेचा गडगडाट होत असताना टी.व्ही. बंद ठेवा, त्याचा प्लग सॉकेटमधून बाहेर काढून ठेवा.

8/8

What are some tips to survive a lightning strike to the body?

 घराबाहेर पडताना हवामान विभागाचा अंदाज पाहा. जर आकाशात काळे ढग असतील किंवा विजा कडकडत असतील तर घराबाहेर पडणे टाळा.