पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्रातील टॉप 10 धबधबे! ये नही देखा तो और क्या ही देखा...

पावसाळा सुरु झाला की डोंगर दऱ्यांमधुन फेसाळणारे धबधबे वाहू लागतात. डोंगर दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे आणि आजूबाजीचे निसर्गरम्य वातावरण मन मोहून टाकते. जाणून घेऊया  पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्रातील टॉप 10 धबधबे. 

| Jun 19, 2024, 23:59 PM IST

Top 10 Waterfalls In Maharashtra : पावसाळा सुरु झाला की डोंगर दऱ्यांमधुन फेसाळणारे धबधबे वाहू लागतात. डोंगर दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे आणि आजूबाजीचे निसर्गरम्य वातावरण मन मोहून टाकते. जाणून घेऊया  पावसाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणारे महाराष्ट्रातील टॉप 10 धबधबे. 

1/10

ठोसेघर धबधबा (Toseghar Waterfall)

सातारा शहरापासून अवघे 25 किलोमीटर अंतरावर  ठोसेघर धबधबा आहे.  महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा आहे. तर, भारतातील उंच धबधब्यांच्या यादीत याचा दुसरा क्रमांक आहे. 

2/10

कुंडमळा धबधबा

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा  धबधबा देखील लोकप्रिय आहे.   

3/10

रंधा धबधबा

अहमदनगर जिल्ह्यातील राजूर – भंडारदरा मार्गावरच रंधा धबधबा आहे.   

4/10

मढे घाट लक्ष्मी धबधबा

पुण्याच्या दक्षिण पश्चिमेला असणारा मढे घाट धबधबा लोकप्रिय आहे. राजगड, रायगड, भाटघर धरण आणि तोरणा किल्ल्याच्या मागील बाजूला मढे घाट धबधबा आहे. हा लक्ष्मी धबधबा म्हणूनही ओळखला जातो.  

5/10

झेनीथ वॉटरफॉल

खोपोली जवळील झेनीथ वॉटरफॉल देखील खूपच लोकप्रिय आहे. 

6/10

मार्लेश्वर धबधबा (Marleshwar Falls)

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात हा धबधबा आहे. मार्लेश्वर हे कोकणातील सर्वात प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. 

7/10

काळू धबधबा

काळू धबधबा हा माळशेज घाटातील सर्वात मोठा धबधबा आहे.   

8/10

लिंगमाला धबधबा (Lingamala Falls)

सातारा जिल्हयातील महाबळेश्वरमध्ये हा धबधबा आहे. हा धबधबा खूपच सुंदर तसेच तितकाच धोकादायक देखील आहे.   

9/10

सहस्त्रकुंड धबधबा (Sahastrakund Falls)

नांदेड शहरापासून अंदाजे 70 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरली गावात हा धबधबा आहे. 

10/10

वजराई भांबवली धबधबा (Vajrai Bhambvali Waterfall)

आशिया खंडातील सर्वात उंच धबधबा आहे. . हा धबधबा जवळपास 1840 फूट उंचीवरुन कोसळतो.  सातारा शहरातून 32 किमी अंतरावर असलेल्या  भांबवली गावातून या धबधब्यापर्यंत पोहचता येते.