डोंगराळ भागात बालपण, 13 वेगवेगळ्या शाळांमध्ये घेतलं शिक्षण, 'ही' अभिनेत्री नेमकी कोण?

सोशल मिडीयावर बऱ्याचशा बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील कलाकरांचे बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात आणि चाहत्यांसाठी सुद्धा असे फोटो पाहणे पसंतीचे असते. कधीकधी तर त्या फोटोंवरुन अभिनेता किंवा अभिनेत्रींना ओळखणंसुद्धा कठीण असते. 

Jan 15, 2025, 17:16 PM IST

Guess the Bollywood Actress: सोशल मिडीयावर बऱ्याचशा बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील कलाकरांचे बालपणीचे फोटो व्हायरल होत असतात आणि चाहत्यांसाठी सुद्धा असे फोटो पाहणे पसंतीचे असते. कधीकधी तर त्या फोटोंवरुन अभिनेता किंवा अभिनेत्रींना ओळखणंसुद्धा कठीण असते. 

 

1/7

अशात एका बॉलिवूडमधील अभिनेत्रीने आपल्या शालेय जीवनातील एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमधून चाहत्यांना तर सुरुवातीला तिला ओळखताच आली नाही.   

2/7

हा फोटो शेअर करताना त्या अभिनेत्रीने सांगितले, "वडीलांच्या नोकरीमुळे मला शिक्षणासाठी 13 वेगवेगळ्या शाळा बदलाव्या लागल्या." तसंच, तिने तिच्या डोंगरी भागातील राहणीमानाबाबत काही गोष्टी सांगितल्या. त्याचबरोबर, तिथले जंगल आणि शाळेतील मित्रांसोबतचे काही फोटो शेअर केले.   

3/7

कोण आहे ही अभिनेत्री

हा फोटो शेअर केल्यानंतर तिने तिच्या चाहत्यांना त्या फोटोत ओळखण्याचं आव्हान दिलं. ही अभिनेत्री बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सेलिना जेटली आहे. सेलिनाने मागील वर्षीच म्हणजे 2024 मध्ये हा फोटो शेअर केला होता.   

4/7

सेलिनाचे शालेय जीवन

सेलिनाचे वडील भारतीय लष्करात अधिकारी होते आणि यामुळे त्यांना खूप वेळा राहण्याचं ठिकाण बदलावं लागलं असल्याचं सेलिनाने फोटो शेअर करताना सांगितलं. केंद्रीय विद्यालय आणि आर्मी पब्लिक स्कूल या सेलिनाच्या आवडीच्या शाळा असल्याचं सुद्धा तिने सांगितलं.   

5/7

डोंगरी भागातील शाळांचे अनोखे अनुभव

सेलिनाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्यासोबत तिच्या दोन मैत्रिणी दिसत आहेत. त्यापैकी केस खुले सोडलेली मुलगी ही सेलिना आहे. तिने आपल्या शालेय जीवनात झाडाखाली अभ्यास करण्याचं, टिफीन शेअर केल्याचं आणि वाटेत जांभळं, सफरचंद खाऊन घरी परतल्याचे अनेक अनुभव सांगितले. 'आमच्याकडे हव्या तशा सुविधा नव्हत्या, पण आमची स्वप्ने नेहमीच मोठी होती', असे सेलिनाने पोस्ट शेअर करताना लिहिलं.  

6/7

सेलिना जेटलीचं अभिनय कार्यक्षेत्र

सेलिनाचा जन्म 24 नोव्हेंबर 1981 रोजी हिमाचल प्रदेशातील शिमलामध्ये झाला. तिने 2003 मध्ये 'जानशीन' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरुवात केली. तिने तिच्या चित्रपट क्षेत्रात जवळपास 25 चित्रपटांमध्ये काम केले. तिने दिलेल्या चित्रपटांपैकी 'नो एंट्री', 'गोलमाल रिटर्न्स' आणि 'अपना सपना मनी मनी' हे काही हिट चित्रपट आहेत.   

7/7

सेलिनाचं वैयक्तिक आयुष्य

सेलिनाने 2011 मध्ये चित्रपटांमधून ब्रेक घेतला आणि उद्योगपती पीटर हागशी लग्न केले. त्यांना तीन मुले आहेत. विन्स्टन आणि विराज या त्यांच्या जुळ्या मुलांचा जन्म 2012 मध्ये झाला आणि 2017 मध्ये सेलिनाने आर्थरला जन्म दिला. आजच्या काळात सुद्धा सेलिना सोशल मिडीयावर खूप अ‍ॅक्टिव असते. आपल्या काही खास क्षणांचे फोटोज ती सोशल मिडीयावर चाहत्यांसोबत शेअर करत असते.