PM नरेंद्र मोदींच्या हस्ते तीन आत्याधुनिक स्वदेशी युद्धनौकांचे लोकार्पण; वाचा थक्क करणारी वैशिष्ट्ये

Jan 15, 2025, 18:27 PM IST
1/7

Three powerful warships launched : भारतीय लष्कराचा आज 77 वा वर्धापन दिवस साजरा केला जात आहे. यानिमित्त मुख्य कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पुण्यात पार पडला. या विशेष दिनी मुंबईच्या नौदल डॉकयार्डमध्ये भारतीय नौदलात तीन शक्तीशाली युद्धनौका सामिल करण्यात आल्या. INS सुरत, INS नीलगिरी आणि INS वाघशीर या अशी त्यांची नावं आहेत. या सर्व युद्धनौका स्वदेशी बनावटीच्या असून त्यात वापरलेली 75 टक्के साधने स्वदेशी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत मिशनमध्ये हा एक महत्वाचा पाऊल आहे. या युद्धनौकांचे भारताच्या समुद्री सुरक्षेला बळकट करण्यात मोठे योगदान राहील. या युद्धपोतांची वैशिष्ट्ये आणि ताकद जाणून घ्या.

2/7

INS सुरत

INS सुरत ही एक अत्याधुनिक युद्धनौका आहे, ज्यात ‘कंबाइंड गॅस अँड गॅस’ (COGAG) प्रोपल्शन सिस्टम वापरण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे चार गॅस टर्बाईन्सच्या मदतीने ही नौका चालते. समुद्री चाचण्यांदरम्यान, तिने 30 नॉट्स (सुमारे 56 किमी/तास) वेगाने धावण्याची क्षमता सिद्ध केली.  

3/7

INS सुरतची पायाभरणी भारतीय नौदलाने 7 नोव्हेंबर 2019 ला केली आणि 17 मे 2022 ला त्याचे काम सुरू करण्यात आले. ही भारतीय नौदलाची आत्तापर्यंत सर्वात जलद गतीची डिस्ट्रॉयर नौका आहे. याची विशेष बाब म्हणजे युद्धाच्या वेळी INS सुरत कोणत्या ठिकाणी असेल हे विरुद्ध सेनेला ट्रेक करता येणार नाही.

4/7

INS नीलगिरी

INS नीलगिरी या नौकेचा प्रोजेक्ट 17ए अंतर्गत तयार करण्यात आला. तिच्या बांधणीला 28 डिसेंबर 2017 रोजी सुरुवात झाली. 

5/7

INS नीलगिरीची लांबी 149 मीटर इतकी आहे तर तिचे वजन 6,670 टन एवढे आहे. विशेष बाब म्हणजे याची डिझाईन रडार सिग्नेचर कमी करण्यासाठी केली आहे. ही युद्धनौका ब्लू वॉटर ऑपरेशन्ससाठी तयार करण्यात आली आहे. 'INS नीलगिरी' ही इंटीग्रेटेड प्लेटफॉर्म मॅनेजमेंट सिस्टमने (IPMS) सुसज्ज आहे. एवढेच नाही तर या युद्धनौकेवर एका पृष्ठभागावरून दुसऱ्या पृष्ठभागावर आणि मध्यम श्रेणीच्या हवेतून प्रक्षेपण होणाऱ्या क्षेपणास्त्रांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये रॅपिड फायर क्लोज-इन वेपन सिस्टम बसवण्यात आले आहेत.  

6/7

INS वाघशीर

INS वाघशीर ही भारतीय नौदलाच्या स्कॉर्पीन-क्लास प्रोजेक्ट 75 अंतर्गत तयार करण्यात आलेली सहावी आणि शेवटची डिझेल-इलेक्ट्रिक युद्धनौका आहे.

7/7

INS वाघशीर ही 67 मीटर लांबीची असून तिचे वजन सुमारे 1,550 टन इतके आहे. याची डिझाईन खास गुप्त ऑपरेशनसाठी तयार करण्यात आली आहे. यामध्ये अत्याधुनिक सोनार सिस्टम आणि वायर-गाइडेड क्षेपणास्त्रे आहेत. या युद्धनौकेची पाण्याखाली आणि पाण्यावर दोन्हीकडे प्रहार करण्याची क्षमता आहे.