अंबानींपेक्षा मोठ्या घरात राहतात 'या' महाराणी! 2,40,00,00,00,000 किंमतीच्या घरात 170 खोल्या, सोन्याच्या भिंती

जेव्हा जेव्हा देशातील सर्वात महागड्या घरांची चर्चा होते तेव्हा रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचं घर अँटिलियाचं नाव प्रत्येकाच्या मनात येते. मात्र थांबा आज आम्ही तुम्हाला भारतातील असं घर सांगणार आहोत, जे अंबानींच्या अँटिलिया, ब्रिटनच्या राणीचा राजवाडा बकिंघम पॅलेससमोर लहान आहे. 

| Jan 15, 2025, 21:31 PM IST
1/11

ब्रिटीश राजघराण्याचा राजवाडा असलेल्या बकिंगहॅम पॅलेस आणि अंबानी यांच्या अँटिलियाबद्दल सतत काही ना काही माहिती समोर येत असते. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, भारतात बकिंघम पॅलेसपेक्षा 4 पट मोठा पॅलेस आहे. हे जगातील सर्वात मोठे घर आहे.  

2/11

केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वात मोठ्या खाजगी निवासस्थानाचं नाव वडोदराच्या 'लक्ष्मी विलास पॅलेस' किंवा बडोदा पॅलेसच्या नावावर ओळखलं जातं. हा राजवाडा गायकवाड राजघराण्याचा महाल आहे. 

3/11

वडोदरामधील लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान असून यासमोर अनेक श्रीमतांची घर फिकी पडतात. 

4/11

गायकवाड कुटुंबीय हे या पॅलेसचे मालक आहे. राजघराण्याचे प्रमुख समरजितसिंह गायकवाड हे त्यांच्या पत्नी राधिकाराजे गायकवाड आणि कुटुंबासह या वाड्यात राहतात. 2013 पासून ते कुटुंबासह या महालात आलिशान जीवनशैली जगत आहेत. 

5/11

1875 मध्ये बडोदा संस्थानाचे महाराजा सयाजीराव यांनी बडोद्यात लक्ष्मी विलास पॅलेस बांधला. ज्याची गणना जगातील सर्वात महागड्या आणि आलिशान राजवाड्यांमध्ये करण्यात येते. 700 एकरमध्ये पसरलेले हे घर इतकं मोठं आहे की त्यात 4 बकिंगहॅम पॅलेस समाविष्ट होऊ शकतात.  

6/11

लक्ष्मी विलास पॅलेस हे बडोद्याच्या राजघराण्याचे म्हणजेच रॉयल गायकवाड कुटुंबाचे घर आहे. राजवाड्याच्या एका भागात राजघराण्याचं वास्तव्य आहे. तर दुसऱ्या भागाचं संग्रहालयात रूपांतर करण्यात आलं असून सर्वसामान्य लोकही राजवाडा पाहू शकतात.   

7/11

हा पॅलेस 3,04,92,000 स्क्वेअर फूटमध्ये पसरलेला आहे. तर हा राजवाडा बनवण्यासाठी 12 वर्षे लागले. या राजवाड्याची रचना चार्ल्स फेलो चिशोम यांनी केली होती. 170 खोल्यांव्यतिरिक्त, पॅलेसमध्ये विशाल बाग, घोडेस्वारी पॅलेस, स्विमिंग पूल, गोल्फ कोर्ससह अनेक सुविधा आहेत. हा राजवाडा बांधण्यासाठी 18 हजार ग्रेट ब्रिटन पौंड खर्च करण्यात आले आहेत. 

8/11

रिअल इस्टेटनुसार अंदाजे या पॅलेसची किंमत सुमारे 2,43,93,60,00,000 रुपये घरात आहे. जर आपण समरजित सिंग यांच्या संपत्तीबद्दल बोललो तर त्यांची एकूण संपत्ती 20000 कोटी एवढी आहे. गायकवाड कुटुंबाची देशभरात अनेक मालमत्ता आहेत.  

9/11

गायकवाड कुटुंबाला राजा रविवर्मा यांच्या अनेक चित्रांचा वारसा लाभलाय. सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह गुजरात आणि वाराणसीमधील 17 मंदिरांचं ट्रस्टचे व्यवस्थापनही गायकवाड कुटुंबाकडे देण्यात आलंय. 

10/11

महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी 1886 मध्ये पहिली मर्सिडीज बेंच पेटंट मोटरवॅगन खरेदी केली. राजघराण्याकडे 1934 ची रोल्स-रॉइस, 1948 ची बेंटले मार्क VI आणि 1937 ची रोल्स-रॉइस फँटम III देखील आहे.

11/11

समरजितसिंह गायकवाड हे महाराजा रणजितसिंह प्रतापसिंह गायकवाड आणि शुभांगिनी राजे यांचे एकुलते एक पुत्र आहेत. समरजित सिंग गायकवाड हे माजी क्रिकेटपटूही राहिले आहेत. वडिलांच्या निधनानंतर समरजितसिंग गायकवाड महाराज झाले. सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये त्याची गणना होते. रणजी ट्रॉफीमध्ये त्याने बडोद्याचे प्रतिनिधित्व केले होते. सहा प्रथम श्रेणी सामने खेळले आणि बडोदा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही कामही त्यांनी पाहिले आहे.