Best Budget 7 Seater Car : 7 सीटर कारचे चांगले पर्याय, अगदी 4 लाखापासून सुरूवात

Sep 23, 2021, 13:31 PM IST
1/5

मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco)

मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco)

या यादीत नंबर वनवर आहे मारूतीची इको कार. ही काल 4 लाखाहून अतिशय कमी वेळेत येते.   Maruti Suzuki Eeco की सुरूवातीची किंमत 3.94 लाख रुपये आहे. या इको कोरमध्ये 1196cc चे 4 सिलेंडरवाले पेट्रोल इंजिन आहे. जे 6000 आरपीएमवर 72.41 एचपी आणि 3000 आरपीएमवर 101 एनएम टॉर्क जनरेट करते. याशिवाय, त्याचे सीएनजी मॉडेल देखील येते. जर आपण त्याच्या मायलेजबद्दल विचार केला तर ते पेट्रोलवर 16.11 kmpl आणि CNG वर 21.94 kmpl चे मायलेज देते.

2/5

डॅटसन गो प्लस (Datsun Go Plus)

डॅटसन गो प्लस (Datsun Go Plus)

स्वस्त सात आसनी कारच्या या यादीत डॅटसन गो प्लसचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाचे बजेट लक्षात घेऊन ही कार तयार करण्यात आली आहे. त्याची सुरुवातीची किंमत 4.26 लाख रुपये आहे. Datsun Go Plus मध्ये 1198cc 3-सिलिंडर SOHC पेट्रोल इंजिन आहे जे 5000 Rpm वर 67 Hp ची पॉवर आणि 4000 Rpm वर 104 Nm टॉर्क जनरेट करते. त्याचा लूकही अप्रतिम आहे.

3/5

रेनॉल्ट ट्रायबर (Renault Triber)

रेनॉल्ट ट्रायबर (Renault Triber)

रेनॉल्ट कारला डिझाईनच्या बाबतीत तोड नाही. रेनॉल्ट ट्रायबरचा स्टायलिश लूक जबरदस्त आहे आणि त्याची किंमतही खूप कमी आहे. त्याच्या सुरुवातीच्या मॉडेलची किंमत 5.50 लाख रुपये आहे, तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत 7.78 लाख रुपये आहे. प्रीमियम लूक सोबतच अनेक लेटेस्ट फिचर्स सुद्धा या कार मध्ये उपलब्ध आहेत. रेनो ट्रायबरमध्ये 999 सीसी 3-सिलिंडर इंजिन आहे, जे 6250 आरपीएमवर 71 एचपी आणि 3500 आरपीएमवर 96 एनएम टॉर्क जनरेट करते.

4/5

मारुती सुझुकी अर्टिगा (Maruti Suzuki Ertiga)

मारुती सुझुकी अर्टिगा (Maruti Suzuki Ertiga)

मारुतीची आणखी एक कार मारुती सुझुकी अर्टिगा देखील लिस्टमध्ये सहभागी आहे.   7 सीटर कार देखील मिडिल क्लास फॅमिलीला पसंत आहे.  याची सुरूवातीची किंमत 7.96 लाख रुपये आहे. तसेच ही कार डीझेल आणि CNG मॉडलमध्ये उपलब्ध आहे. 

5/5

महिंद्रा मराजो (Mahindra Marazzo)

महिंद्रा मराजो (Mahindra Marazzo)

जर तुम्हाला थोडी मोठी कार खरेदी करायची असेल आणि तुमचे बजेट सुद्धा जास्त असेल तर तुम्ही महिंद्राकडून Mahindra Marazzo 7 सीटर कार खरेदी करू शकता, त्याची सुरुवातीची किंमत 12.41 लाख रुपये आहे. महिंद्रा मराझो 1.5-लीटर, 4-सिलेंडर, डिझेल इंजिनसह उपलब्ध आहे. हे BS6 इंजिन 122PS ची पॉवर आणि 300 Nm चे पीक टॉर्क जनरेट करते.