IND VS ENG: चेन्नई टेस्टमध्ये अश्विनचा नवा रेकॉर्ड, हरबजनलाही धाडलं मागे
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विननं मोलाची कामगिरी केली आहे. पहिल्याच डावात अश्विननं इंग्लंड संघाला जेरीस आणलं होतं. अवघ्या 43 धावांमध्ये अश्विननं 5 विकेट्स एकाच डावात आपल्या नावावर केल्या आहेत. आतापर्यंत अश्विननं असे अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत त्याविषयी जाणून घेऊया.
1/4
रविचंद्रन अश्विननं एकाच डावात 5 विकेट घेऊन चमकदार कामगिरी केली. कसोटी सामन्यात एकाच डावात 5 विकेट्स घेणारा अश्विन जगातला पाचवा स्पिनर गोलंदाज ठरला आहे. त्याने 29 व्या वेळा पुन्हा हा पराक्रम केला आहे. सर्वात पहिल्या स्थानावर श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू मुथैया मुरलीधरन (67) त्यानंतर शेन वॉर्न (37) अनिल कुंबळे (34) रंगना हेराथ (34) आणि त्यानंतर आता अश्विनलाही या यादीत स्थान मिळालं आहे. (फोटो क्रेडिट - BCCI)
2/4
3/4