#DeepVeerReception दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनला पोहोचले 'हे' खास पाहुणे

Nov 22, 2018, 07:57 AM IST
1/8

#DeepVeerReception दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनला पोहोचले 'हे' खास पाहुणे

इटलीतील लेक कोमो येथे पार पडलेल्या विवाहसोहळ्यानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग भारतात परतले. भारतात त्यांच चाहत्यांकडून आणि माध्यमांकडून मोठ्या दणक्यात स्वागत झालं. ज्यानंतर ही जोडी दीपिकाच्या माहेरी म्हणजेच बंगळुरूला रवाना झाली. दीपिका आणि तिच्या माहेरच्या कुटुंबीयांकडून येथे एका स्वागतसोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. रिसेप्शनच्या निमित्ताने दीप-वीर पुन्हा एकदा सेलिब्रिटी फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी याच्या अफलातून कलेक्शनमध्ये दिसले. 

2/8

#DeepVeerReception दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनला पोहोचले 'हे' खास पाहुणे

काळ्या आणि सोनेरी रंगसंगतीमध्ये रणवीरने घातलेली बंदगळा शेरवानी  त्याला शोभून दिसत होती. तर, दीपिका पूर्ण सोनेरी रंगाच्या साडीमध्ये एखाद्या महाराणीप्रमाणे दिसत होती. 

3/8

#DeepVeerReception दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनला पोहोचले 'हे' खास पाहुणे

हिरव्या रंगाचे रत्न असणारा एक चोकर नेकलेस तिने घातला होता. ज्याला मोत्यांच्या पाचपदरी हाराची जोड होती. केसांचा घट्ट आंबाडा, त्यावर गजरे आणि भांगातील कुंकू असं एकंदर तिचं रुप अगदी उठून दिसत होतं. 

4/8

#DeepVeerReception दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनला पोहोचले 'हे' खास पाहुणे

बंगळुरू येथील द लीला पॅलेस येथे पार पडलेल्या या रिसेप्शन सोहळ्याला बऱ्याच सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळाली. तुलनेने यात क्रीडा विश्वातीच चेहरे जास्त प्रमाणात दिसले. 

5/8

#DeepVeerReception दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनला पोहोचले 'हे' खास पाहुणे

बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू यावेळी 'दीप-वीर'ला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली होती. 

6/8

#DeepVeerReception दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनला पोहोचले 'हे' खास पाहुणे

दीपिका आणि रणवीरला शुभेच्छा देण्यासाठी माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी सपत्नीक हजेरी लावली होती. 

7/8

#DeepVeerReception दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनला पोहोचले 'हे' खास पाहुणे

दीपिका आणि तिच्या आईच्या चेहऱ्यावर असणारा आनंद यावेळी ओसंडून वाहत होता. 

8/8

#DeepVeerReception दीपिका-रणवीरच्या रिसेप्शनला पोहोचले 'हे' खास पाहुणे

रणवीर आणि त्याच्या भावंडांसोबतही यावेळी दीपिका बरीच रुळलेली दिसली.