जबरदस्त! सौंदर्याला Muscular Body ची जोड, शरीरसौष्ठवपटूंनाही लाजवतेय ही तरुणी

Jessica Sestrem From Germany: सोशल मीडियावर (Social Media) सध्या एका तरुणीचा फोटो चांगलाच व्हायरल होतोय. मॉडेल्सलाही टक्कर देईल असं तिचं सौंदर्य आहे. पण त्याचबरोबर तिचं पिळदार शरीर एका बॉडिबिल्डरलाही (BodyBuilder) लाजवेल असं आहे. पिळदार शरीर आणि तिच्या सौंदर्यामुळे या मुलीची चांगलीच चर्चा आहे. बॉडिबिल्डिंग आजही पुरूषप्रधान संस्कृती असली तरी आता ती वेगाने बदलतेय याचं जीवंत उदाहरण म्हणजे ही मुलगी आहे.

राजीव कासले | Jun 01, 2023, 16:54 PM IST
1/5

अवघ्या चौदाव्या वर्षात तिने व्यायामाला सुरुवात केली आणि आज ती आघाडीची महिला शरीरसौष्ठवपटू म्हणून प्रसिद्ध झालीय. या मुलीचं नाव आहे जेसिका सेस्ट्रेम (Jessica Sestrem). जेसिका जर्मनीत राहाते आणि लहाणपणापसून तीने बॉडिबिल्डिंगचं स्वप्न बाळगलं होतं.

2/5

जेसिकाने अनेक जागतिक महिला शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये तिने जर्मनीचं प्रतिनिधित्व केलं आहे. ती एक सर्टिफाइड पर्सनल ट्रेनर आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ बॉडीबिल्डिंग आणि फिटनेस प्रोफेशनल आहे. 

3/5

जेसिका सोशल मीडियावरही तितकची सक्रिय असते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहे. OnlyFans असं एक पेजही तिने बनवलं आहे. जेसिका अनेकदा वर्कआउट, आर्म रेसलिंग, फ्लेक्सिंगचे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करते. इतकंच नाही तर स्पेशल कंटेटसाठी काही जणं तिला पैसेही देतात.

4/5

फिटनेसमुळेच मी माझ्यातल्या सर्वोत्तम गुणाला जगासमोर आणू शकली आहे असं जेसिका म्हणते. माझ्यासाठी जिंकण्यापेक्षा खेळणं महत्त्वाचं आहे. लढण्याची वृत्ती महत्वाची आहे. त्यामुळे मला जितकी वर्षे शक्य आहे, तितकी वर्ष बॉडिबिल्डिंग करत राहाणार असल्याचं जेसिका सांगते.

5/5

शरीरसौष्ठव खेळ हा पुरूषप्रधान आहे, ही समजूत जेसिकाने खोडून काढली आहे. चूल-मुल सांभाळणाऱ्या महिला 'पॉवरफुल' झाल्या आहेत हे जेसिकाने दाखवून दिलं आहे. खेळणं आणि संघर्ष करणं आपल्याला जगायला शिकवते या तत्वावर आपण पुढे जात असल्याचं जेसिका तरुण पिढीला सांगते.