IPL 2023 : सनरायजर्स हैदराबादचे टॉप 5 खेळाडू, आयपीएलमध्ये ठरणार गेम चेंजर

Sunrisers Hyderabad squad for IPL 2023 : आयपीएलच्या नव्या हंगामासाठी नव्या कर्णधारासह, युवा खेळाडूंसह सनरायजर्स हैदराबादचा (Sunrisers Hyderabad) संघ सज्ज झाला आहे. 2016 मध्ये हैदराबादने आयपीएलच्या ट्रॉफीवर (IPL) नाव कोरलं.  पण त्यानंतर हैदराबादला चांगली करता आलेली नाही. आयपीएलचा पंधरावा हंगाम तर हैदराबादसाठी अतिशय निराशाजनक ठरला.  

Mar 30, 2023, 13:55 PM IST
1/6

सनरायजर्स हैदराबाद

गत हंगामात पॉईंटटेबलमध्ये (IPL Point Table) हैदराबाद आठव्या स्थानावर होती. पण यावर्षी सनरायजर्स हैदराबादने आपल्या संघात अनेक बदल केले आहेत. इतकंच काय तर कर्धणारही बदलला आहे. नव्या संघात असे काही खेळाडू आहेत ज्यांच्यात सामन्याचा निकाल  फिरवण्याची ताकद आहे. जाणून घेऊया अशा पाच खेळाडूंबद्दल.

2/6

एडम मार्करम

या यादीत सर्वात पहिलं नाव येतं ते सनरायजर्सचा नवा कर्णधार एडन मार्करमच (Adein Markram). दक्षिण आफ्रिकेचा 28 वर्षांचा हा आक्रमक फलंदाज ओपनिंग आणि मधल्या फळीतही उपयुक्त ठरु शकतो. इतकंच नाही तर तो गरज पडल्यास संघासाठी फिरकी गोलंदाजीही करण्यात माहिर आहे. यंदाच्या हंगामात त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.   

3/6

मार्को जेनसन

या यादीत दुसरं नाव आहे ते दक्षिण आफ्रिकेचा डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मार्को जेनसन (Marko Jansen). जेनसनच्या वेगासमोर टिकाव धरणं विरुद्ध संघांच्या खेळाडूसमोर आव्हान ठरणार आहे. याबरोबरच तो आक्रमक फलंदाजीसाठीही ओळखला जातो.

4/6

हॅरी ब्रूक

इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) हा हैदरासाठी हुकमी एक्का ठरू शकतो. 24 वर्षांच्या ब्रूकने कारकिर्दीच्या सुरुवातीच आपली छाप उमटवली आहे. इंग्लंडसाठी तो केवळ 6 कसोटी सामना खेळलाय आणि यात त्याने 80 च्या स्ट्राईकरेटने 809 धावा केल्या आहेत. आता ब्रुक आयपीएलमध्ये पदार्पण करतोय. 

5/6

उमरान मलिक

गेम चेंजर खेळाडूंच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे तो टीम इंडियाचा सर्वात वेगावन गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik). सनरायजर्स हैदराबादकडून गेल्या हंगामात खेळता संपूर्ण क्रिकेट जगताने त्याच्या गोलंदाजीचा वेग पाहिला. याच जोरावर त्याला थेट टीम इंडियात एन्ट्री मिळाली. टीम इंडियाकडून तो अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून त्याच्या अनुभवाचा आणि वेगाचा हैदराबादला मोठा फायदा होणार आहे. 

6/6

राहुल त्रिपाठी

या यादीतला पाचवा खेळाडू आहे राहुल त्रिपाठी (Rahul Tripathi). आयपीएलच्या गेल्या काही हंगामात राहुल त्रिपाठी हे नाव चांगलंच गाजलं आहे. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या राहुल त्रिपाठीने आयपीएलमध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला आहे. एकहाती सामना फिरवण्याची ताकद राहुल त्रिपाठीमध्ये आहे.