Ram Navami 2023: तब्बल 550 किलोमीटर उलटा पायी चालत प्रवास... गुजरातमधील अनोखा साईभक्त दर्शनासाठी शिर्डीत दाखल

रामनवमी देशभरातून भाविक शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत. नाशिक जिल्ह्यातून प्रत्येक महामार्गावर साई भक्त पालखीसह शिर्डी मध्ये दाखल होताना दिसत आहेत. यामध्ये हा साईभक्त चक्क उलटा चालत आला आहे.

Mar 30, 2023, 15:53 PM IST

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : रामनवमीनिमित्त शिर्डीत साईभक्तांची अलोट गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी दर्शन रांगा ओसंडून वाहताना दिसत आहेत. दुपारी बारा वाजता साई मंदिरात राम जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. अशातच गुजरातवरुन शिर्डीत चालत आलेल्या एका साईभक्ताने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

1/7

Ram Navami Shirdi

देशभरात रामनवमीचा उत्साह असून साईंची नगरी शिर्डी सध्या राम नामाच्या जयघोषणात दुमदुमली आहे. साईनगरीत दरवर्षी रामनवमीचा उत्सव तीन दिवस साजरा केला जातो. 

2/7

sai Devotee at shirdi

राज्यातील विविध भागातून आणि शेजारील कर्नाटक तेलंगणा तामिळनाडू मध्य प्रदेश या राज्यातूनही भाविक रामनवमीनिमित्त साईनगरी शिर्डीत पोहोचले आहे. याशिवाय राज्यातील कानाकोपऱ्यातून पायी चालत येणाऱ्या पालक याही साईनगरी शिर्डीत दाखल झाल्यात.

3/7

Ram Navami Unique Devotee Walking

रामनवमीच्या निमित्ताने शिर्डीत येणाऱ्या पदयात्री भाविकांची मोठी रेलचेल असते कुणी अनवाणी तर कुणी चपला घालून लहान पासून आबालवृद्धांपर्यंत प्रत्येक जण आपल्या मनात श्रद्धा घेऊन शिर्डी मध्ये दाखल होतो.

4/7

guajrat sai Devotee

मात्र साडेपाचशे किलोमीटरवर असलेल्या गुजरातमधील भरूच पासून ते थेट शिर्डी उलटा प्रवास करणारा एक साईभक्त सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

5/7

Reverse Walking

आजकालच्या जगामध्ये सरळ चालणं गरजेचं असताना लोक उलट चालतात म्हणजे चुकीच्या पद्धतीने आपले काम करतात त्यांना जाग यावी यासाठी हा साईभक्त उलटा प्रवास करत आहे.

6/7

sai Devotee

हा साईभक्त नित्यनेमाने उलटा प्रवास करतात वर्षभरातून पाच वेळेस साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीत येत असतो.

7/7

sai baba

साईबाबांसारखीच वेषभूषा असलेल्या या साईभक्ताच्या अनोख्या पदयात्रेने सर्वांचे लक्ष वेधलं आहे. सध्या हा साईभक्त रामनवमीच्या निमित्ताने साईबाबांच्या चरणाशी लीन होण्यासाठी शिर्डीत पोहोचत आहे