IPL 2023 Photos: आयपीएलचे 'हे' पाच Records कधीच मोडले जाऊ शकत नाहीत!

आयपीएलमध्ये दरवर्षी अनेक रेकॉर्ड (IPL Records) बनतात. तर अनेक रेकॉर्ड बनले जातात. मात्र, असे काही रेकॉर्ड आहेत, जे मोडणं जवळजवळ अशक्य असल्याचं म्हणावं लागेल. कोणते रेकॉर्ड आहेत पाहूया...

Mar 17, 2023, 17:03 PM IST

IPL 2023 Photos: आयपीएलमध्ये दरवर्षी अनेक रेकॉर्ड (IPL Records) बनतात. तर अनेक रेकॉर्ड बनले जातात. मात्र, असे काही रेकॉर्ड आहेत, जे मोडणं जवळजवळ अशक्य असल्याचं म्हणावं लागेल. कोणते रेकॉर्ड आहेत पाहूया...

1/5

आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक कोणाच्या नावावर असेल तर तो आहे...ख्रिस गेल (Chris Gayle). 2013 साली फक्त 30 चेंडूत त्याने हा विक्रम केला होता.

2/5

एका डावात सर्वाधिक षटकार खेचण्याचा विक्रम देखील मोडणं सोप्पं नाही. ख्रिस गेल (Chris Gayle) याच्या 175 धावांची धुंवाधार पारीवेळी त्याने 17 सिक्स खेचले होते.

3/5

सर्वात महाग षटक टाकण्याचा रेकॉर्ड देखील मोडणं जवळजवळ अशक्य आहे. बंगळुरूकडून खेळताना हर्षल पटेलने (Harshal Patel) 37 धावा केल्या आहेत. 2021 साली हर्षलने हा नकोसा रेकॉर्ड नावावर केलाय.

4/5

संघाचा सर्वाधिक सलग विजयाचा रेकॉर्ड मोडणं जवळजवळ अशक्य आहे. केकेआरने (KKR) 2014-15 च्या आयपीएलमध्ये सलग 10 विजय नोंदवले होते.

5/5

सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याचा विक्रम कधीही मोडला जाऊ शकत नाही. 2013 मध्ये पुणे वॉरियर्स इंडियाकडून खेळताना युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने (Chris Gayle) 175 धावांची धुंवाधार पारी खेळली होती.